Wings ने भारतातील ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल क्षेत्रामधील झपाट्याने विकसित होणारा डायरेक्‍ट-टू-कंझ्युमर ब्रँड म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान दृढ केले आहे. विंग्ज कंपनीने नवीन प्राइम स्मार्टवॉच आणि नवीन विंग्ज Flobuds 300 TWS इअरबड्स भारतात लॉन्च केले आहेत. विंग्ज कंपनीला डिवाईसनेक्‍स्‍ट समिट येथे ‘मोस्‍ट पॉप्‍युलर टीडब्‍ल्‍यूएस ब्रँड’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या प्राइम स्मार्टवॉच आणि विंग्ज फ्लोबड्स ३०० TWS ची किंमत, फीचर्स , स्पेसिफिकेशन्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विंग्ज कंपनीने आपली नवीन स्मार्टवॉच श्रेणीतील प्राइम स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. ज्याची किंमत १,४९९ रूपये इतकी आहे. यामध्ये १.९ इंचाची एचडी स्क्रीन, ऍडव्हान्स सिंगल चिप ब्लूटूथ कॉलिंग, जास्त काळ टिकणारी बॅटरी ही या स्मार्टवॉचमध्ये मिळणारी फीचर्स आहेत. कॉलिंगशिवाय स्मार्टवॉचची बॅटरी ७ दिवस तर कॉलिंगसह ३ दिवस इतकी टिकते. यामध्ये १२० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड, रिअल टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, एसपीओ २ ट्रॅकिंग ही हेल्थ संदर्भात देण्यात आलेली फीचर्स आहेत. तसेच यात २०० पेक्षा अधिक वॉच फेसेस, २ इनबिल्ट गेम्स, ई-कार्ड सपोर्ट, पासवर्ड लॉक, कॅमेरा कंट्रोलसह अनेक स्मार्ट फीचर्स मिळतात.

हेही वाचा : Oppo A78 Vs Realme 11 5G: कॅमेरा आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन ठरतो बेस्ट? एकदा पाहाच

यासह कंपनीने विंग्‍ज फ्लोबड्स ३०० इअरबड्स लॉन्च केले आहेत. याची किंमत ९९९ रुपये इतकी आहे. लक्झरी लेदर फिनिशसह फ्लोबड्स ३०० तुमच्या गाणी ऐकण्याचा अनुभव खूप चांगला अनुभव देतात. या इअरबड्समध्ये स्मार्ट ENC, १३ मामीचे ड्रायव्हर्स आणि ५० तासांचा प्ले बॅक टाइम या इअरबड्समध्ये मिळणार आहे.

कंपनीचे सह-संस्‍थापक विजय वेंकटश्‍वरन म्‍हणाले, “विंग्‍ज प्राइमसह आम्‍हाला वेअरेबल्‍स क्षेत्रात व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश करण्‍याचा आनंद होत आहे. प्राइम स्‍मार्टवॉचच्‍या पॉवर-पॅक फीचर्ससह आम्‍ही युवा पिढीला पसंत असलेले आधुनिक डिझाइन ट्रेंड्स लक्षात घेत प्रॉडक्ट्स सतत शिपिंग करत आहोत. हीच बाब फ्लोबड्स ३०० साठी देखील आहे. ज्‍यामध्‍ये अद्वितीय लेदर फिनिश आहे, जे इतर कोणत्‍याही टीडब्‍ल्‍यूएस इअरबडच्‍या तुलनेत अद्वितीय आहे.”

हेही वाचा : Reliance Jio च्या युजर्सना धक्का; आता स्वस्त प्लॅनसाठी ११९ नाही तर मोजावे लागणारे ‘इतके’ रुपये

विंग्ज कंपनीची दोन्ही प्रॉडक्ट्स ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहेत आहे. जेथे प्राइम फक्त फ्लिपकार्टवर फ्लोबड्स ३०० खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि विंग्ज कंपनीची वेबसाइट येथे उपलब्ध असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wings launch prime smartwatch and flobuds 300 tws earbuds india 50 hours playback time check all features tmb 01