बार्सिलोनो येथे सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस म्हणजेच MWC 2023 या शो मध्ये Xiaomi ने आपली Xiaomi १३ ही सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने ३ स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. आता कंपनीने Xiaomi 13 Pro या फोनची भारतामधील किंमत आणि विक्री कधीपासून सुरु होणार याची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. या फोनच्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहेत फीचर्स ?

Xiaomi 13 Pro या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा WQHD+ AMOLED डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२०Hz इतका आहे. या फोनमध्ये १९०० निट्स इतका पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर काम करतो.

हेही वाचा : मोठी बातमी! माजी सीईओच देत आहेत Twitter ला टक्कर; जॅक डोर्सींनी लॉन्च केले Bluesky अ‍ॅप, वाचा सविस्तर

कसा असणार कॅमेरा ?

Xiaomi 13 Pro मध्ये कंपनी तुम्हाला DSLR कमरेच्या लेव्हलचा कॅमेरा देणार आहे. भारतात येणाऱ्या फोनचा कॅमेरा Leica ब्रॅंडिंगसह येणार आहे. त्यामध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचे तीन कॅमेरे असतील. तसेच वापरकर्त्यांना यामध्ये OIS फिचर देखील मिळेल ज्यामुळे तुम्ही यामधून स्मूथ व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणार तसेच या फोनला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येणार आहे.Xiaomi 13 Pro या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ४८२० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यामध्ये १२० वॅटचे चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच ५० वॅटचे फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील यात वापरकर्त्यांना मिळणार आहे. हा स्मार्टफोन ५जी नेटवर्कला सपोर्ट करतो.

काय आहे किंमत ?

Xiaomi 13 Pro 5G या स्मार्टफोनची १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ७९,९९९ रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर ICICI बँकेच्या कार्डवर १०,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे तुम्ही हा फोन ६९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच कंपनी नॉन रेडमी आणि शाओमी स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर ८,००० रुपयांची मोफत देत आहे. तर शाओमी आणि रेडमी स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर १२,००० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे या फोनची किंमत ही ५७,९९९ रुपये आहे. हा फोन ६ मार्च पासून दुपारी १२ वाजल्यापासून mi.com, निवडक mi homes आणि Mi Studio वरून खरेदी करता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi launch xiaomi 13 pro smartphone in india with 50 mp camera features mwc 2023 tmb 01