वेगळा इंटरनेट अनुभव देण्याच्या उद्देशाने नोकियाने आशा २०५ आणि नोकिया २०६ अशी दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली आहेत. ही दोन्ही मॉडेल्स सिंगल सिम आणि डय़ुएल सिम दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
नोकिया आशा २०५ : सोशल मोबाईल फोन
नोकियाने बाजारात आणलेल्या या मोबाईलचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला क्वर्टी की बोर्ड असून सोशल नेटवर्किगसाठी एक खास फेसबुक बटन देण्यात आले आहे. त्यामुळे सतत सोशल नेटवर्किगसोबत कनेक्टेड राहण्यासाठी आसुसलेल्या तरुणाईला हा फोन आपलासा वाटू शकतो. किंबहुना तरुणाईला समोर ठेवूनच हे उत्पादन आकारास आणले आहे. फेसबुक बटनाशिवाय इ- बडी, चॅट, ट्विटर, इ-मेलची सोय आदी अनेक बाबीही यात देण्यात आल्या आहेत. यामध्ये असलेल्या इ- बडी स्क्रीन नोटिफिकेशन्समुळे सतत अपडेट राहाता येते. यासोबत लाइफ प्लस अॅप्स मोफत देण्यात आली आहेत. त्यात लाइफ स्किल्स आणि लाइव्ह हेल्थी सेवांचा समावेश आहे. नोकिया स्टोअरमधील ४० गेम्स यासोबत मोफत डाऊनलोड करता येतील. यातील डय़ुएल सिम फोनमध्ये नोकिया इझी स्व्ॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या सिम कार्डाचा वापर करण्यापूर्वी फोन बंद करावा लागत नाही. कंपनीचा दाव्यानुसार, सिंगल सिम असलेल्या मोबाईलचा स्टॅण्ड बाय टाइम ३७ दिवस तर डय़ुएल सिमचा तोच कालावधी २५ दिवसांचा आहे.
नोकिया २०६
नोकिया २०६ हा मोबाईल जुन्या पारंपरिक मोबाईलप्रमाणेच दिसणारा आहे. मात्र त्याला २.४ इंचाचा मोठा स्क्रीन देण्यात आला असून त्यामुळे इंटरनेट पाहाणे, गेम्स खेळणे, मित्रांशी चॅटवर गप्पा मारणे हे सारे सहज करता येते. फेसबुक आणि ट्विटरचा अॅक्सेसदेखील होम स्क्रीनवरच देण्यात आला आहे. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमध्ये हे मॉडेल उपलब्ध आहे.
या मॉडेलचे काही विशेष
* सोबत वापरलेल्या इमेजिंग तंत्रज्ञानामुळे यातील १.३ मेगापिक्सेल कॅमेऱ्यावर टिपलेले फोटो लगेचच शेअर करणे शक्य आहे.
* सोबत इ- बडी, वॉटस्अॅपचा वापरही करता येईल.
* हे मॉडेल सिंगल व डय़ुएल सिम दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे.
* डय़ुएल सिममध्ये त्याचा वापर करताना दरखेपेस फोन बंद करण्याची गरज नसते. त्यासाठी नोकिया इझी- स्व्ॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
* बॅटरीचा स्टॅण्ड बाय टाइम सिंगल सिममध्ये ४७ दिवस तर डय़ुएल सिममध्ये २८ दिवसांचा आहे.
* भारतीय बाजारपेठेतील किंमत नोकिया रु. –
वायरलेस की बोर्ड आणि माऊसची जोडगोळी
भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. १,८९५/-
लिनोवो थिकसेंटर एज ६२ झेड
हल्ली संगणकाची खरेदी करताना अनेकांना भेडसावणारा प्रश्न असतो तो नवीन डिजिटल स्मार्ट दिसणारे आटोपशीर डेस्कटॉप खरेदी करायचे की, मग पारंपरिक पीसीच्या मार्गाने जायचे. कारण पारंपरिक डेस्कटॉप हे दिसायला आणि वापरायला आकाराने मोठे दिसतात. म्हणजे अगदी मोठय़ा मॉनिटर युनिटची जागा एलसीडी स्क्रीनने घेतली तरी खालच्या बाजूस मात्र मोठा सीपीयू हा जागा खातोच.
पण अलीकडे बाजारात आलेल्या नव्या डिजिटली स्मार्ट दिसणाऱ्या डेस्कटॉप्सनी एक नवा ट्रेंड बाजारात आणला आहे, तो म्हणजे सारे काही इंटिग्रेटेड केलेल्या डेस्कटॉप पीसींचा. महत्त्वाचे म्हणजे यात सारे काही एकत्र तर असतेच पण त्याच बरोबर ते आटोपशीर आणि दिसायलाही स्मार्ट असतात. त्यातच त्यांची किंमतही खिशाला परवडणारी असते. पण या साऱ्यांची असलेली एक मोठी अडचण असते ती अपडेशनची. त्यांची अपडेशन किंमत मात्र अधिक मोजावी लागते. कारण अपडेशनसाठी आवश्यक गोष्टी बाजारात सहजी मिळत नाहीत आणि मग कंपनी त्यासाठी चांगलेच पैसे आकारते. असो, काहीही असले तरी सध्या हा ट्रेंड वेगात पसरतो आहे, हे खरे.
अशाच स्मार्ट डेस्कटॉपच्या मांदियाळीमध्ये आता येऊन दाखल झाला आहे तो लिनोवो थिंकसेटंर एज ६२ झेड. कमीतकमी ऊर्जेचा वापर हा त्याचा विशेष आहे, असा कंपनीचा दावा आहे. वेगवान सीपीयूसाठी इंटेलचा थर्ड जनरेशन कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. यात इंटेलच्या एचडी ग्राफिक्सचा वापर करण्यात आला असून त्यामुळे यंत्रणा वेगात बूट होते. कंपनीमध्ये, कार्यालयात आटोपशीर म्हणून वापरणार असाल तर तुमच्या कार्यालयीन बाबी सोप्या करण्याचा विचारही त्यात करण्यात आला असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी हा उत्तम आहे. महत्त्वाचे म्हणजे वेब कॅमेरा सुरू केल्यानंतर आजूबाजूचे अनावश्यक आवाज कमी करणारी यंत्रणा आपोआप सुरू होते. यामध्येच दोन व्ॉटचे स्पीकर्स देण्यात आले असून हार्डवेअर पासवर्ड मॅनजरची सोयही देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. २६,०००/-
हर्मन कार्डन क्लासिक इअरफोन
वापरकर्त्यांच्या डोक्याचा किंवा कानाचा आकार कसा आहे, हे काही कंपन्यांना ठावूक नसते. मात्र तरीही त्या अॅडजस्टेबल असा गोष्टी तयार करतात. पण खास करून इअरफोनच्या बाबतीतील अनुभव असा आहे की, ते आपल्या डोक्याला फिट्ट बसतच नाहीत. मग आपण हैराण होतो. डोक्याला ते सारे फिट्ट बसले तर कानाजवळ ते नेमके बसताना समस्या येतात. हे सारे टाळण्यासाठी हर्मन कार्डनने संशोधनामध्ये बराच काळ व्यतित करून हे नवे इअरफोन डिझाईन केले आहेत. हे सर्व प्रकारच्या डोक्यांच्या आकारांवर नेमके बसतात आणि कानांवरही. त्यासाठी दोन्हीमध्ये अॅडजेस्ट करण्यासाठीची सेटिंग्ज देण्यात आली आहेत.
हे वापरताना आपले कान सिलबंद केल्यासारखा अनुभव असतो, त्यामुळेच मग आपल्याला संगीताचा चांगला अनुभव घेता येतो. आणि बाहेरचे सारे आवाज बाहेरच राहतात. इतके सारे असले की, मग अनेकदा ते वजनदार होतात पण या क्लासिक इअरफोनबाबत मात्र तसे म्हणता येत नाही ते वजनाने अतिशय हलके आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. ९,९९०/-
एफ अॅण्ड डीचे स्पीकर्स
दोन मोठय़ा आकाराचे सडपातळ सॅटेलाइट स्पीकर्स अशी त्यांची रचना आहे. ते ३० डब्लू सबवुफर ६५०० वॅट पीएमपीओशी जोडलेले आहेत. त्यामुळे तुमच्या फ्लॅट स्क्रीनच्या दोन्ही बाजूस हे टॉवर स्पीकर्स ठेवता येतील. त्याचे बाह्य़ावरण लाकडाचे असून त्यामुळे आवाजातील अस्पष्टता कमी होण्यास मदतच होते. यामध्ये ३ इंचाचे आणि ६.५ इंचाचे बास ड्रायव्हर्स सॅटेलाइट आणि सबवुफर्समध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे याची सुश्राव्यता कानसेनांना नक्कीच आवडेल.
ए५७०यू हे स्लीम डिझाईन त्याच्या मेटल ग्रील्समु ळे दिसायला देखणे तर आहेच. पण त्यातील थेट यूएसबी किंवा एसडी कार्ड जोडणे यासारख्या सुविधांमुळे ते अतिशय उपयुक्तही आहे. हे स्पीकर्स टीव्ही, डीव्हीडी किंवा पीसी असे कोणत्याही उपकरणाला थेट जोडता येतात.
भारतीय बाजारपेठेतील किंमत रु. ८,८९०/-