शिवरायांनी बांधलेल्या अनेक जलदुर्गावर दुर्गप्रेमींची पावले सतत उमटत असतात. या जलदुर्गाच्या माळेतीलच खांदेरी व उंदेरी मात्र परवानगीअभावी आजवर त्यांच्यापासून दूर राहत होता. पण आता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या महाभ्रमण योजनेखाली ‘जिद्द’ मासिकाद्वारे तेथे जाणे शक्य झाले आहे. खांदेरी किल्ल्यावर १८९१ सालातील मोठी घंटा पाहावयास मिळते. या बेटावर १८६७ मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले दीपगृह आहे. लोखंडाचा आवाज करणारा एक दगड आहे. गडावर महादेव, एकवीरा, गणपती, मारुती, बुद्धविहार, क्रूस अशी अलीकडे बांधलेली धर्मस्थळे आहेत. गडावर काही तोफा आहेत. उंदेरी किल्ल्याचा दरवाजा बऱ्यापैकी शाबूत असून धक्क्य़ाच्या जवळच एक छोटेसे लेणे आहे. अशा या दोन्ही जलदुर्गावर भ्रमंतीचा बेत पनवेलच्या जिद्द आणि पुण्याच्या मैत्रयी ट्रेकिंग क्लबने रविवार १६ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी सुनील राज, पनवेल (९८६९३३१६१७) यांच्याशी संपर्क साधावा.
हरिश्चंद्रगड पदभ्रमण
हिंदवी परिवारातर्फे कळसुबाई हरिश्चंद्रगड रतनगड पदभ्रमंती मोहिमेचे ४ ते ६ जानेवारी २०१३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -अभिजित भडंगे ९०११०१४३९९.
ताडोबा जंगल सफारी
रायगड प्रदक्षिणा
दुर्गनिबंध स्पर्धेचे आयोजन
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2012 रोजी प्रकाशित
ट्रेक डायरी : खांदेरी-उंदेरीची मोहीम
शिवरायांनी बांधलेल्या अनेक जलदुर्गावर दुर्गप्रेमींची पावले सतत उमटत असतात. या जलदुर्गाच्या माळेतीलच खांदेरी व उंदेरी मात्र परवानगीअभावी आजवर त्यांच्यापासून दूर राहत होता. पण आता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या महाभ्रमण योजनेखाली ‘जिद्द’ मासिकाद्वारे तेथे जाणे शक्य झाले आहे.

First published on: 12-12-2012 at 12:00 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary khanderi and undheri forts