Champions Trophy 2025 Rohit Sharma Fact Check Video : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने नवीन जर्सी परिधान केल्यानंतरचे फोटो पोस्ट केले आहेत. १९९६ च्या विश्वचषकानंतर पाकिस्तान आपला पहिला आयसीसी इव्हेंट आयोजित करत आहे, यासाठी आठ संघात ट्रॉफीसाठी स्पर्धा होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना यजमान संघ आणि २०१७ मध्ये शेवटचा विजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात होईल. पाकिस्तानच्या कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओत क्रिकेटपटू रोहित शर्माचे एअरपोर्टवर स्वागत होत असल्याचे दिसतेय. विशेष म्हणजे या व्हिडीओत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार देखील दिसतायत. दरम्यान, हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, खरंच रोहित शर्माचे पाकिस्तानात दाखल झाला होता का? व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर फैजान खानने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील तोच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आम्ही तपास सुरू केला.

रिव्हर्स इमेज सर्चदरम्यान आम्हाला ‘Rohitions45’ या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.

व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले होते : राशीन महाराष्ट्र येथे बॉस रोहित शर्माचे भव्य स्वागत.

हा व्हिडीओ ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

आम्हाला असे अनेक व्हिडीओ आढळले, ज्यातील व्हिज्युअल महाराष्ट्रातील असल्याचे नमूद केले आहे.

आम्हाला या कार्यक्रमाशी संबंधित अनेक बातम्या आढळल्या.

https://www.indiatvnews.com/sports/cricket/rohit-sharma-launches-new-cricket-academy-in-ahmednagar-district-of-maharashtra-2024-10-04-955405
https://www.esakal.com/krida/cricket/video-viral-captain-rohit-sharma-take-of-his-shoes-before-seeking-blessings-of-great-men-and-gods-chhatrapati-shivaji-maharaj-svg87

निष्कर्ष :

क्रिकेटपटू रोहित शर्माचे पाकिस्तानमध्ये स्वागत झाल्याचा व्हायरल दावा आणि व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील अहमदनगरमधील आहे. रोहित शर्माने त्याची नवीन क्रिकेट अकादमी सुरू केली, त्या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy 2025 fact check rohit sharma maharashtra old video shared as welcome in pakistan sjr