Elephant Attack On Bus Video Viral : जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. अशीच एक भयानक घटना आंध्रप्रदेशच्या आर्थम या ग्रामिण भागात घडलीय. येथील पार्वथीपूरम मान्यम जिल्ह्यात एका महामार्गावर पिसाळलेल्या हत्तीने प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसवर हल्ला केला. हत्तीने केलेल्या खतरनाक हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हत्तीने बसच्या बोनेटला जोरदार धडक दिली. त्यानंतर पिसाळलेल्या हत्तीने एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्तीचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@krishna0302 नावाच्या यूजरने हत्तीचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता की, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या बसवर हत्तीने हल्ला केला. त्यानंतर बसचालकाने बसला मागे फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हत्तीने रस्त्यावर असलेल्या एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्तीचा हल्ल्यामुळे प्रवासी भयभीत झाले आणि त्यांनी तातडीनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली.

इथे पाहा हत्तीचा खतरनाक व्हिडीओ

ओडीशाच्या ग्रामीण भागात हिंस्र प्राण्यांचा मुक्तसंचार वाढला असून प्राणी माणसांवर हल्ला करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसच काही लोक प्राण्यांना अमानुष मारहाणही करतात. त्यामुळे प्राणी मित्र संघटनांकडून या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्याची मागणी सुद्धा केली जात आहे. प्राण्यांना जंगलात सुरक्षित संचार करता यावं, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीही केली जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant attacked on bus in andhra village and damages windshield of passenger wild animal dangerous video viral on twitter nss