‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. याचाच प्रत्यय तामिळनाडूमधील कोइम्बतूरमध्ये आला आहे. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात ओव्हरटेक करताना झाला आहे. या अपघाताचा सीसीटिव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढे जाण्याच्या नादात तरुण वाहनांना ओव्हरटेक करायला जातात. पण कधी कधी हा प्रयत्न अंगलट येतो. असाच अपघात तमीळनाडूमध्ये झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरुन एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील प्रवास करत होते. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

वडिलांचा जागीच मृत्यू

ओव्हरटेक करणाऱ्या कारने बाईकला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा १० फूट हवेत उडाला. त्यांची बाईकही हवेत उडाली आणि यांच्या गाडीच्या मागून येणाऱ्या टोम्पो ट्रॅव्हलर गाडीची समोरची काच तोडून बाईक या गाडीमध्ये घुसली. दुचाकी चालकाला या टोम्पो ट्रॅव्हलर गाडीचा फटका बसला आणि ते रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा रस्त्याच्या एका कडेला फेकला गेला. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – लहान मुलांना चॉकलेट देताय? ‘हा’ Viral video पाहून पायाखालची जमीन सरकेल!

दरम्यान मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. धडक झाल्याचा क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father dead 15 yr old son injured after car rams motorcycle in coimbatore gruesome video viral surfaces watch srk