Pigeon Cat Fight Video : प्राण्यांच्या शिकारीचे, भांडण वा लढाईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी साप-मुंगुसाचं घनघोर युद्ध तर कधी साप-मगरीची लढाई असे अनेक प्राणी जंगलात एकमेकांवर हल्ला करत वर्चस्वासाठी लढाई लढत असतात, एकमेकांची शिकार करतात, ज्याचे धक्कादायक व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. त्यात काही वेळा प्राण्यांच्या लढाईचे काही मजेशीर व्हिडीओदेखील व्हायरल होतात, ते पाहून खूप हसायला येतं. सध्या एका मांजरीच्या पिल्लाच्या आणि कबुतराच्या भांडणाचा मजेशीर असा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओत मांजरीचं पिल्लू कबुतराची शिकार करण्याचा प्रयत्न करतंय. पण, ते कबुतर ज्या प्रकारे त्याच्याशी खेळतंय, त्याची खोडी काढतंय ते पाहून तुम्हाला हसू येईल.

तुम्हा सर्वांना माहीत असेल की, मांजर हा एक शिकारी प्राणी आहे, तो आपल्या प्रतिस्पर्धी वा शिकारीवर जोरदार हल्ला करतो. या व्हिडीओतही मांजरीचं पिल्लू एका कबुतरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतेय. पण, कबुतर त्यालाही काही खेळवत खेळवत त्रास देतेय आणि पुढे मांजर जे करतं, ते पाहून तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

कारण- या व्हिडीओमध्ये मांजर कबुतराला नाही, तर चक्क कबुतर मांजरीला त्रास देताना दिसतेय, तसेत व्हिडीओच्या शेवटी असे काही घडते, ज्याची कोणी अपेक्षाही केली नसेल.

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, मांजरीचं पिल्लू आणि कबुतर दोघेही एकमेकांना भिडतात. प्रथम मांजर कबुतरावर हल्ला करते, तर कबुतर मोठं धाडस दाखवीत मांजरीच्या कानात चोचीनं टोचत राहते. त्यामुळे चवताळलेलं मांजरीचं पिल्लू मागे वळून थेट कबुतराची मान पकडते. एकमेकांवर हल्ला करताना दोघेही जमिनीवर पडतात; पण मांजर आपली पकड कायम ठेवते. या संपूर्ण लढाईत कबुतर अजिबात हार मानण्यास तयार होत नाही. ते स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावते; परंतु मांजरीचं ते पिल्लू पुन्हा उठून कधी कबुतराच्या पायाला चावते, तर कधी त्याची मान पंजात पकडून दाबण्याचा प्रयत्न करते. यावेळी मांजरीची पकड सैल होताच संधी साधत कबुतर चोचीनं तिच्यावर जोरदार हल्ला चढवते. यादरम्यान मांजरीच्या पिल्लाला समजते की, ते ही लढाई जिंकू शकत नाही. त्यामुळे ते मैदान सोडून चक्क पळू लागते. मांजरीचं पिल्लू लढाई सोडून पळत असताना कबुतर मात्र तिच्या मागे मागे पळत राहतं.

https://www.instagram.com/p/DKgSgWvToTD/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=86d88575-8749-4bf7-a485-2e20060ef49c

मांजर आणि कबुतराच्या लढाईचा हा हास्यास्पद व्हिडीओ @talwar1962 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर अनेकविध कमेंट्सही आल्यात. एकीकडे लोक मांजरीच्या पिल्लाला भित्रा म्हणत आहेत; तर दुसरीकडे लोक कबुतराच्या शौर्याचं कौतुक करीत आहेत.