सोशल मीडियावर सध्या एका वरातीदरम्यानच्या अत्यंत धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. हो कारण या व्हिडीओमध्ये एक स्कॉर्पिओ कार वरातीत नाचणाऱ्या लोकांना चिरडून भरधाव वेगाने जाताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, ही अपघाताची घटना उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात घडली आहे. एका लग्नाच्या वरातीमध्ये नाचत असणाऱ्या लोकांना ओव्हरटेक करून एक स्कॉर्पिओ भरधाव वेगाने जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर अनेक लोक जखमी झाले असून जखमींचा आकडा जवळपास ३० इतका आहे.

हेही पाहा- ..म्हणून ‘त्याने’ स्वतःच्या अंतर्वस्त्रात ठेवला ५ किलोचा दगड; नोकरभरतीतील धक्कादायक प्रकार उघड

लग्नाच्या वरातीत डान्स करणाऱ्या लोकांचा व्हिडीओ शूट करत असतानाच अचानक ही कार लोकांना चिरडून गेल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवाय या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील बहाद्राबाद भागात घडलेल्या घटनेनंतर कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे.

तर स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, संतप्त जमावाने स्कॉर्पिओचा पाठलाग करत ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. त्यानंतर मद्यधुंद कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, कार ड्रायव्हरला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणीही लोकांनी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haridwar shocker drunk driver rams through wedding procession killing 1 injuring many accident video viral jap