King Cobra Shocking Video : पावसाचे दिवस सुरू असल्याने जंगलात अनेक ठिकाणी सापांचा वावर दिसून येतोय. अगदी धबधबे, नदीकाठ या ठिकाणी साप मोठ्या संख्येने शिकारीच्या शोधात फिरताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पिकनिकला जाताना काळजी घ्यावी, सतर्क राहावे; अन्यथा एक चूक, निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात काही तरुण पावसाळ्यात एका नदीकाठी आरामात मजा-मस्ती करतायत; पण तितक्यात मागून एक भलामोठा किंग कोब्रा येतो आणि पुढे जे काही घडतं, ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.

पावसाळ्यात अनेक तरुण निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा प्लॅन बनवतात; पण त्याच निसर्गरम्य ठिकाणी अनेकदा अप्रिय घटना घडतात, ज्याचा कधी कोणी विचारही केला नसेल. या व्हिडीओतील तरुणांच्या बाबतीतही तेच घडले. ते आरामात नदीकाठी बसून पावसाचा आनंद घेत होते, त्याच वेळी त्यांच्यामागून एक भलामोठा किंग कोब्रा हल्ला करण्याचा उद्देशाने आला; पण तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

व्हिडीओत पाहू शकता की, तीन तरुण नदीत भिजल्यानंतर काठावर बसून आराम करतायत. त्याच वेळी त्यांच्यातील एका तरुणाला झुडपातून काहीतरी हालचाल जाणवते. त्यामुळे तो पळत दोन मित्रांजवळ येतो आणि नंतर तिघेही थेट नदीत उडी मारतात. काही क्षणांत इतके काय घडते ते सुरुवातीला काहीच समजत नाही; पण पुढे एक महाकाय किंग कोब्रा फणा काढून झुडपातून बाहेर पडताना दिसतो. याच किंग कोब्राच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी तरुण नदीत उडी मारतात हे समजते. हे तरुण भीतीने पोहत पोहत दुसऱ्या काठावर जाऊन पोहोचतात. सुदैवाने साप कोणालाही दुखापत न करता, निघून जातो. तरुणांच्या सतर्कतमुळे ते वाचले; पण तुमच्याही बाबतीत अशी घटना घडू शकते. त्यामुळे पावसाळ्यात नदीकिनारी किंवा धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जात असाल, तर थोडी सावधगिरी बाळगा.

किंग कोब्राचा हा भयानक व्हिडीओ @toyotoyo1015 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओतून लोक पावसाळ्यात पिकनिकला जाताय; मग सावधगिरी बाळगा, असे आवाहन करतायत. तर अनेक जण हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचे सांगतायत.