Monkey Fight Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ फार रंजक, मजेशीर असतात, जे पाहून अनेकदा हसू आवरणं अवघड होतं. सध्या माकडाचा असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात माकडाबरोबर मस्ती करणं एका तरुणाला चांगलचं भारी पडलं आहे. माकडांच्या टोळीला तरुण मोठ्या हुशारीत हुसकावून लावत असतो. पण, याचवेळी तरुणाबरोबर असं काही घडतं की पाहून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल. नेमकं माकडं तरुणाबरोबर काय करतात पाहू…

जंगलात राहणारी माकडं बहुतांश वेळा कळपात फिरतात. कधीकधी ते मानवी वस्तीत शिरतात आणि हैदोस घालतात. यावेळी कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही, कारण ते पटकन एखाद्यावर झडप घालून जखमी करतात. व्हिडीओतील तरुणाच्या बाबतीतही तेच घडले. मोठ्या हुशारीत तो माकडांच्या टोळीला हुसकावण्यास गेला, पण एका माकडानेच त्याला अशी काही फाईट दिली की थेट तो जमिनीवर कोसळला.

व्हिडीओत पाहू शकता की, तरुण घरासमोर हैदोस घालणाऱ्या माकडांच्या टोळीला मोठ्या आत्मविश्वासाने मारत सुटला. हातात काठी घेऊन तो माकडांना पळवू लागला. ती माकडंही भीतीने इकडे तिकडे सैरावैरा पळू लागली. तरीही तो तावडीत सापडेल त्या माकडाला काठीने मारू लागतो. तरुणाचे हे कृत्य पाहून माकडं आणखी चवताळतात आणि ते थेट तरुणाचीच हवा टाईट करतात. तरुणाला वाटते असे करून माकडं घाबरून पळून जातील, पण तसे काही घडत नाही.

माकड तरुणाच्या दिशेने धावत चेहऱ्यावर घालतो झडप

एक माकड त्याच्या दिशेने जोरात धावत येते आणि थेट त्याच्या चेहऱ्यावर झडप घालते. यामुळे तरुण जोरात जमिनीवर कोसळतो. इतर माकडंदेखील या संधीचा फायदा घेत जोरजोरात आवाज करू लागतात आणि एक एक करून त्याच्या अंगावर उड्या मारू लागतात. यामुळे तरुण खूप घाबरतो आणि उठून तिथून पळून जातो. यावेळी रस्त्यावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. दरम्यान, अशाप्रकारे माकडांच्या एका टोळीने तरुणाची हवा चांगलीच टाईट केली.

माकडांच्या हल्ल्याचा हा मजेशीर व्हिडीओ @ankitrawal1182 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरणं अवघड झालं आहे. काही जण याला “माकडांचे WWE” म्हणत आहेत, तर काही जण “बुद्धिमत्तेचा अंत” म्हणत आहेत. एका युजरने कमेंट केली की, “जर त्याला माकडांशी फाइट करायचीच होती तर त्याने आधी सराव करायला हवा होता!” दुसऱ्याने लिहिले की, “संपूर्ण कहाणी १० सेकंदात संपली! माकडांनी दाखवले, खरा पैलवान कोण आहे.”