Students singing 'Aurat Chalisa' went viral on social media; This video was shared on social media by a Twitter user named KhadedaHobe | Loksatta

विद्यार्थ्यांनी गायलेली ‘औरत चालीसा’ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, वा..रे..वा!

या व्हायरल व्हिडीओत शाळेचे विद्यार्थी आपल्या वर्गशिक्षकांसामोर चक्क ‘औरत चालीसा’ गातांना दिसून येतात.

विद्यार्थ्यांनी गायलेली ‘औरत चालीसा’ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, वा..रे..वा!
विद्यार्थ्यांनी गायली औरत चालीसा. (Photo-twitter.com/KhadedaHobe)

आपण सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडिओ बघत असतो. यामध्ये आपल्याला रोज काही ना काही नवनवीन आणि अतरंगी गोष्टी बघायला मिळतात. हे व्हायरल व्हिडीओ कधी आपल्याला आनंदाचा झटका देतात तर कधी आपले डोळे आश्चर्याने चक्रावून जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाळेचे विद्यार्थी आपल्या वर्गशिक्षकांसामोर ‘औरत चालीसा’ गातांना दिसून येतात. हा हास्यास्पद प्रकार पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

काय आहे ‘या’ व्हिडीओमध्ये ?

हा व्हिडीओ KhadedaHobe नावाच्या ट्विटर यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुले महिला शिक्षिकेसमोर गाणे गाताना दिसत आहेत. ते विद्यार्थी महिलांच्या स्वभावाला स्मित चिमटा घेत सुरात ‘औरत चालीसा’ सादर करतात. त्यांचे ही चालीसा ऐकून महिला शिक्षकांना हसू आवरता येत नसल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

(आणखी वाचा : बेल्जियमची मुलगी ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात वेडी; भारतात आली आणि मग…)

काय म्हणाले नेटकरी ?
विद्यार्थ्यांनी गायलेली ‘औरत चालीसा’ सोशल मीडियावर व्हायरल झाली. या व्हिडिओला जवळपास २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून त्याला दर्शकांनी मज्जेशीर पसंती दिली आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यावर एक दर्शक म्हणतो की, यामुळे महिलांना अधिक शक्ती मिळेल. तर दुसरा म्हणतो महिलांना हे दुखविण्यासाठी नसून ही खरी परिस्थिती आहे, अशी देखील मजेशीर प्रतिक्रीया नोंदविली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:14 IST
Next Story
झकास! बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा त्याच्या ‘या’ लक्झरी कारसोबतचा फोटो झाला व्हायरल