‘दिल दोस्ती दुनियादारी’ गाजवलेले माजघरातील दोन ‘दोस्त’ आपल्याच हिताच्या चार चांगल्या गोष्टी सांगू पाहताहेत एका व्हिडीओमधून..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजकालची अख्खी तरुण पिढीच फार ‘रॅश’ ड्रायिव्हग करते असं एकंदरीतच सगळ्या मोठ्यांचं म्हणणं असतं. अनेक वेळा सांगूनही ही मुलं काही सुधारत नाहीत अशी त्यांची एक नेहमीची तक्रार असते. त्यातही बाईकवर मागे बसलेली किंवा कारमध्ये बाजूला बसलेली ‘मुलगी’ असेल तर ‘ड्रायव्हर’ला अजूनच हुरूप येतो, असं पुन्हा मोठ्यांचंच म्हणणं. एकूणात काय, तर हल्लीची मुलं कशाही गाड्या ‘पळवतात’. मोठ्यांच्या समंजस उपदेशाला काही कोणी जुमानत नाही असं बघून आता आपणच एकमेकांना समजवायला हवं, कदाचित अशाच विचाराने ‘भा.डि.पा.’ अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या ‘कािस्टग काउच’मुळे हिट झालेल्या युट्यूब चॅनेलने ‘आपल्या बापाचा रस्ता’ हा नवीन व्हिडीओ नुकताच प्रदíशत केला.

तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील आशू अर्थात पुष्कराज चिरपुटकर आणि नचिकेत पूर्णपात्रे यांनी ‘अ बिगिनर्स गाईड टू रॅश ड्रायिव्हग’ या टॅगलाईनसह हा व्हिडीओ आणला आहे. पुष्कराजला कार शिकण्याची हौस म्हणून त्याने नचिकेतच्या ‘सुपर हिट अ‍ॅन्ड रन ड्रायिव्हग स्कूल’मध्ये नाव नोंदवलं आहे आणि त्याला कार शिकवणारा नचिकेत हा वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता कार चालवावी या मताने वागणारा आहे. ड्रायिव्हग स्कूलमध्ये शिकवले जाणारे साधे वाहतुकीचे नियमही, सिग्नल पाळण्यापासून ते ‘नो एन्ट्री’मध्ये गाडी चालवण्यापर्यंत, कोणताच नियम नचिकेत स्वतही पाळत नसल्याने शिकणाऱ्यांनाही ‘नियम पाळायचे नसतात’ असंच शिकवतो.

आजकालच्या मुलांचं बेछूट ड्रायिव्हग बघता आणि त्यांच्यापुढे उभे असणारे ‘आदर्श’ पाहता त्यांना सभ्य शब्दात समजावून भागणार नाही हे ‘भा.डि.पा’ने पूर्णत ओळखलेलं आहे. आजच्या तरुणाईला ‘सारकॅझम’ अर्थात उपरोधात्मक भाषाच कळत असल्यामुळे ‘भा.डि.पा’ने ‘नियम पाळावे’ असं न सांगता ‘नियम हे पाळण्यासाठी नसतातच, ड्रायिव्हग करायचं तर आपल्या बापाचा रस्ता असल्यासारखं, स्वतवर विश्वास ठेवून ड्रायिव्हग करायचं’ अशा प्रकारच्या संवादातून सगळ्या रॅश ड्रायव्हर्सना टोकलं आहे.

वेदवती चिपळूणकर

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aplaya bapacha rasta new video of bhartiya digital party