रेट्रो स्टाइलच्या कपडय़ांबरोबरच केसांत फुलं माळण्याची फॅशनही पुन्हा एकदा ‘ट्रेण्डी’ मानली जाऊ लागली आहे. यंदा फॅशन रॅम्पवरही गुलाब, मोगरा, अबोलीनं हजेरी लावलेली दिसली.
रेट्रो जमान्यातील काही फॅशन ट्रेण्ड्स नाव बदलून पुन्हा एकदा आपल्याला नव्याने दिसून येताहेत त्याचप्रमाणे अॅक्सेसरीजदेखील जुन्या जमान्यातल्याच हिट होताहेत. हेड गीअर्समध्ये खऱ्या फुलांना पुन्हा एकदा बहर आला आहे. केसांत गजरे आणि फुले माळण्याची पारंपरिक पद्धत सध्या ‘इन थिंग’ झाली आहे. केसांचा अंबाडा (म्हणजे आजच्या काळातील बन) जसा सध्याच्या नवनवीन हेअर स्टाइल्समध्ये पुन्हा एकदा विसावला तसाच त्याला सजवण्यासाठी फुलांचे गजरे, गुलाब, चाफा अशी फुलं ‘हेड गीअर’ म्हणून सध्या पुन्हा एकदा वापरात येत आहेत.
चित्रपटातील ही फॅशन रॅम्पवरदेखील दिसू लागली. या हंगामातील लॅक्मे फॅशन वीकमध्ये भारतीय शैलीतील आधुनिक डिझाइन्स सादर करताना डिझायनर्सनी मॉडेल्सच्या केशभूषेकडे विशेष लक्ष दिलेले दिसले. त्यामध्येदेखील फुलांचा वापर आवर्जून केला गेला. डिझायनर गौरांगसाठी रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स तर मोगरा आणि अबोलीचे गजरे घालून रॅम्पवर आल्या होत्या. विशेष म्हणजे घोळदार वेस्टर्न गाउन्स परिधान करतानाही हेड गीअर्स म्हणून गजरा वापरला गेला. पिनाकिन या डिझायनरने सुद्धा आपल्या हेड गीअर्ससाठी फुलांचा पुरेपूर वापर केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
चलती का नाम ट्रेण्ड : फूलों में बहार है!
हेड गीअर्समध्ये खऱ्या फुलांना पुन्हा एकदा बहर आला आहे.
Written by प्राची परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-05-2016 at 01:20 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retro fashion come into trend