पाडव्याच्या तोंडावर पालघरनजीक असलेल्या ‘इप्सित स्वीट होम’ नावाच्या गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग्ज सुरू करीत असल्याची घोषणा या प्रकल्पाच्या प्रवर्तक हर्ष रिअ‍ॅल्टर्सनी केली आहे. या गृहप्रकल्पात पाडवा ते रामनवमी या दरम्यान बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना २५ हजारांची विशेष सूटही देण्यात येणार आहे.
पालघर हे मुंबईनजीक नव्याने अस्तित्त्वात येणारे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पालघर पट्टय़ात मोठे उद्योग व बंदरे येऊ घातली आहेत. तसेच रस्ता आणि रेल्वे ते मुंबईशी जोडलेले शहर आहे. चर्चगेट ते पालघर अशी उपनगरीय रेल्वे सेवा लवकरच सुरू होऊ घातली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक परवडणाऱ्या दरातील गृहयोजना आकार घेत आहेत. हर्ष रिअ‍ॅल्टर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न गडकरी यांच्यामते येणारे मराठी नववर्ष एकूणच स्थावर मालमत्ता उद्योगासाठी चांगले जाईल. ‘इप्सित स्वीट होम’च्या पहिल्या टप्प्याचे बुकिंग पूर्ण झाले. घरांची विक्री चारपटीने वाढली. यंदाच्या पाडव्याला दुसऱ्या टप्प्यालाही भरपूर बुकिंग्ज मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.