इलेक्ट्रिकल केबल्स, कम्युनिकेशन केबल्स या उत्पादनांबरोबरच आता फिनोलेक्सने ‘स्पीकर केबल्स’ बाजारात सादर केल्या आहेत.कोणत्याही व्यत्ययाशिवाय चांगल्या दर्जाच्या आवाजासाठी या केबल्स उपयोगी ठरणार आहेत. मोठय़ा रहिवासी संकुलांमध्ये स्पीकर्स अॅम्प्लिफायरला जोडण्यासाठी या केबल्सना मागणी आहे. या केबलसाठी आग प्रतिरोधक मटेरिअल वापरण्यात आले आहे. तापमान नियंत्रण करण्याची क्षमता हे या केबलचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने फिनोलेक्स केबल उपयोगी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या केबल्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.