‘एनव्हिडिया’तर्फे नवीन जीपीयू बाजारात
कॉम्प्युटरवर गेम्स खेळणे अधिक आनंददायक बनावे यासाठी वापरली जाणारी नवीन जीपीयू यंत्रणा (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) ‘एनव्हिडिया’ या कंपनीने बाजारात आणली आहे. ही नवीन GeForce GTX 650 Ti Boost जीपीयू यंत्रणा २ जीबी आणि १ जीबी अशा दोन क्षमतांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी कंपनीने सर्वप्रथम जीपीयू यंत्रणा बाजारात आणली होती. नव्या सुधारीत जीपीयू यंत्रणेत अधिक वैशिष्टय़ांचा समावेश असल्याने अधिक ग्राफिक्सची गरज असणारे काँम्प्युटर गेम्सही या यंत्रणेच्या साहाय्याने सहज खेळता येतील असे कंपनीने म्हटले आहे. यातील २ जीबी यंत्रणेची किंमत ११,९९९ रूपये आहे, तर १ जीबी यंत्रणेची किंमत १०,४९९ रूपये आहे.   
मुंबई-पुणे प्रवासाला ‘विंग्ज’ सोयीस्करता
फोक्सव्ॉगनच्या आलिशान ‘वेंटो’ कारमधून मुंबई-पुणे एक्स्प्र-वेने आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सोय विंग्ज ट्रॅव्हल्स कंपनीच्या नवीन विंग्ज प्रीमियर सेवेद्वारे करण्यात आली आहे. या सेवेचा वेगळेपणा म्हणजे प्रवाशांच्या घरापासून पिक-अप आणि पुण्यापर्यंत कोणत्याही इच्छित स्थळाच्या उंबरठय़ापर्यंत सोडण्याची सोय यात केली गेली आहे. एका फोनद्वारे अथवा http://www.wingstravels.com या वेबस्थळावर क्लिक करून या सेवेसाठी सत्वर बुकिंग, प्रत्येक कारमध्ये जीपीएस यंत्रणा अशी वैशिष्टय़े असलेली या सेवेसाठी रु. २४९९ दरनिश्चिती करण्यात आली आहे.
‘पॅराशूट’ला अद्ययावत रुपडे
केसांच्या निगेतील अग्रणी उत्पादन ‘पॅराशूट’ने बदाम तेलापेक्षा तीनपटीने जास्त जीवनसत्व असलेल्या ‘अॅडव्हान्स्ड टेंडर कोकोनट हेअर ऑइल’चे रूप धारण केले आहे. कोवळ्या नारळातून काढण्यात येणाऱ्या या आधुनिक तेलामध्ये ट्रायग्लिसेराइड फॉम्र्युला वापरात आला आहे. घाई-गडबडीच्या आधुनिक जीवनशैलीली साजेसे हे तेल हलके असूनही पोषणमूल्यांनी समृद्ध बनले असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे तेल ५० मिली ते ३०० मिली या पॅकमध्ये अनुक्रमे २४ रुपये ते १२० रुपये या किमतीला उपलब्ध झाले आहे.
‘वृषालीज्’ स्वास्थ्य सल्लागार दालन मुंबईत
फिटनेस क्षेत्रात संशोधन करून त्याचे पेटंट मिळविणाऱ्या पहिल्या महिला फिटनेसतज्ज्ञ वृषाली मेहेंदळे यांच्या ‘वृषालीज्’ नावाने विलेपार्ले (पूर्व) येथील स्वास्थ्य स्लागार दालनाचे अलीकडेच अलिबागच्या उप-जिल्हाधिकारी विजया जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कोणत्याही साधनांशिवाय घरी करता येतील असे व्हिट्रेक्स पॅटर्नमधील साधेसोपे परंतु अत्यंत परिणामकारक व्यायामाचे प्रकार या फिटनेस कन्सल्टन्सी सेंटरमधून सांगितले जातील. शिवाय प्रत्येकाच्या आवडीची घरगुती आहाराची पोटं भरणारी व्हेज-नॉनव्हेज डाएट्ससुद्धा सांगितली जातील, अशी ग्वाही देताना वृषाली मेहेंदळे म्हणाल्या, ‘मला तुमचा फक्त एक तास द्या, तुमचे आयुष्य व तुमचा फिटनेस दोन्ही पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी तो पुरेसा ठरेल.’ खास मधुमेहींसाठी भारतात प्रथमच तयार करण्यात आलेल्या स्कॅरेक्स पॅटर्नच्या व्यायाम प्रकाराचे पेटंटही आपल्याला लवकरच अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
‘राइस टू रिचेस’ उपक्रम
भारतीयांच्या मुख्य दैनंदिन आहार असलेल्या भाताच्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या पाकक्रिया असू शकतील? फार तर फोडणी भात, बिर्यानी, इडली, डोसा वगैरे.. परंतु तांदळाच्या देशभरात प्रचलित असलेल्या अगणित पारंपरिक पाकक्रिया खूपच अधिक असून त्याचा माग ‘राइस टू रिचेस’ या अनोख्या स्पर्धात्मक उपक्रमाद्वारे घेतला जाणार आहे. येत्या ११एप्रिलपासून पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत असलेल्या या स्पर्धेचे आयोजन बासमती तांदळाचे अग्रणी ब्रॅण्ड रॅडिकलने केले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसह प्रमुख आठ महानगरे आणि आसपासच्या शहरांमध्ये ही स्पर्धा बडय़ा ५०० निवासी संकुले, गृहनिर्माण संस्थांमध्ये आयोजित होत आहे. निवड झालेल्या सर्वोत्तम पाकक्रियेला आलिशान कारचे इनाम दिले जाईल. गुणवत्ता, पोषणमूल्य आणि पॅकेजिंगमध्ये नवा दर्जा सांभाळणाऱ्या ‘रॅडिकल’ ब्रॅण्डचा तांदूळ घराघरात पोहचविण्यासाठी हा उपक्रम खासच मदतकारक ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.
टेकझोनचे ‘मॅजिक व्हॉइस’
जगभरात चार कोटी वापरकर्ते असलेले टेकझोन मॅजिक व्हॉइस हे गमतीशीर अॅप भारतात दाखल झाले आहे. हे पेटंटप्राप्त आयव्हीआर अॅप्लिकेशन असून ते टेकझानेच्या ‘ब्लॅकएनग्रीन’ या आंतरराष्ट्रीय विभागाने विकसित केले आहे. या अॅपद्वारे यूजरना त्यांचा आवाज विविध ३० प्रकारे बदलता येईल. शिवाय कोणत्याही प्रकारच्या हँडसेट्स वापरता येईल अशी ही मूल्यवर्धित सेवा आहे. सध्या युनिनॉर (भारतभर) या दूरसंचार सेवाप्रदात्यांकडे मॅजिक व्हॉइस उपलब्ध असून येत्या सहा महिन्यांत ते सर्व प्रदात्यांपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.
एमआरएफचे ब्लॉक पॅटर्न टायर्स
द मेटेऑर एम, मेटेऑर आणि मोटा-डी अशी ब्लॉक पॅटर्न टायर्सची नवीन श्रेणी एमआरएफ टायर्सने भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. या श्रेणीत एकूण आठ आकारांमध्ये टायर्स उपलब्ध झाले आहेत. विशेषत: सध्याचा मोटरसायकल्सचा ट्रेंड लक्षात घेऊन तसेच ट्रेड कम्पाऊंडचा वापर करून यांचे खास डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे ओलसर रस्त्यावर गाडी चालविताना पुरेशी स्थिरता मिळेल.
सणावारांच्या खरेदीसाठी ‘आर्ट एक्स्पो’ दालन
पाडवा आला की लग्नसराई आणि सणावारांना सुरुवात होते आणि खरेदीसाठी धावपळ आणि पर्यायाने वणवणही सुरू होते. नेमकी ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊनच लग्नसराई आणि सणावारांसाठी लागणाऱ्या सर्व दर्जेदार वस्तूंचे दादर येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे भरले आहे. सर्वच वस्तू एकाच छताखाली मिळत असल्याने ग्राहकांची प्रदर्शनाकडे वर्दळ वाढू लागली आहे. शनिवार, ६ एप्रिल ते ११ एप्रिलच्या गुढीपाडव्यापर्यंत हे अभिनव उद्योग-व्यवसाय संकल्पना घेऊन पुढे आलेल्या नवउद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन ‘आर्ट एक्स्पो’ या संस्थेने भरविले आहे. लग्नसराई व सणावारांसाठी उपयुक्त दागिने, वैविध्यपूर्ण साडय़ा, वस्त्रे, गृहोपयोगी वस्तू व हस्तकलेच्या चित्ताकर्षक वस्तू या प्रदर्शनात पाहण्या व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
चैत्राच्या चाहुलीसह आपल्याकडे सणासुदीची आणि लग्नसराईची लगबग सुरू होते. याच मोसमाचे औचित्य साधून ग्राहकांच्या पसंतीच्या वस्तू     एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणारे अशा प्रकारचे हे पहिलेच प्रदर्शन व पेठ आहे, असा दावा ‘आर्ट एक्स्पो’च्या संचालिका उज्ज्वल  सामंत यांनी केला. व्यावसायिक धडाडी असलेल्या उद्योजक व   कलाकारांना या प्रदर्शनानिमित्त आपली अभिनव उत्पादने, कलाकृती आणि सेवा लोकांपर्यंत अल्पखर्चात पोहचविण्याचे हे उमदे व्यासपीठही ठरत आहे.