तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या चीनचे पंतप्रधान लि केक्विआंग यांच्या सान्निध्यात एक भारतीय कंपनी म्हणून काही काळ व्यतीत करण्याचा मान केवळ टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसला मिळाला. देशातील पहिल्या क्रमांकाची आयटी कंपनी व १० अब्ज डॉलरचा पल्ला गाठणारी एकमेव टीसीएसच्या गोरेगाव येथील कार्यालयाला चीनच्या पंतप्रधानांनी भेट दिली. येथून त्यांनी टाटा समूहातील टीसीएसच्या शांघाय येथील जागतिक विकास केंद्रातील कर्मचाऱ्यांशी माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठाद्वारे संवाद साधला.
टाटा समूहाने आपला ब्रिटिश ब्रॅन्ड जग्वार लॅन्ड रोव्हरद्वारा चीनमध्ये केलेल्या पदार्पणाचा विषयही या भेटीदरम्यान चर्चेत आला. टाटासाठी व्यवसाय म्हणून चीन हा महत्त्वाचा भौगोलिक भाग असल्याचे मिस्त्री या वेळी म्हणाले. उभय देशांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही अधिक कार्य करण्याची संधी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
चिनी पंतप्रधानांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यातील चर्चेत सहभागी होणारी टाटा ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. चीनमध्ये माहिती तंत्रज्ञान व्यवसाय करणारी टीसीएस ही पहिली भारतीय आयटी कंपनी आहे. टीसीएसचे तेथील कार्यक्षेत्र बरोबर दशकापूर्वी सुरू झाले. तेथील प्रमुख सहा शहरांमध्ये कंपनीचे अस्तित्व आहे. अनेक चिनी सरकारी योजना तसेच १४ चिनी बँकिंग व्यवस्थेत कंपनीचे योगदान आहे.
चीनच्या चेरी ऑटोमोबाइलशी भागीदारीद्वारे टाटा समूहातील जग्वार लॅन्ड रोव्हरने नोव्हेंबर २०१२ मध्ये चीनमध्ये शिरकाव केला. तेथील स्थानिक चलनातील (रेनम्बी) एकत्रित गुंतवणूक १०.९ अब्ज आहे. ब्रिटनव्यतिरिक्त जग्वार लॅन्ड रोव्हरचा हा पहिला वाहन निर्मिती प्रकल्प आहे. तेथे कंपनीचे १६३ हून अधिक विक्री जाळे आहे.
दरम्यान, भारतातील आघाडीची पायाभूत सुविधा विकास व वित्तीय कंपनी असलेल्या आयएल अॅन्ड एफएसने चीनच्या इंडस्ट्रिअल अॅन्ड कमर्शिअल बँक ऑफ चायना (एशिया) लि. (आयसीबीसी) बरोबर मंगळवारी एक करार केला. या करारामुळे उत्तर व पूर्व आशियातील परस्पर पायाभूत सुविधा विकास सेवा पुरविले जाणाऱ्या आहेत. उभय कंपन्यांच्या वतीने यावेळी अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक रमेश बावा व उपमुख्य कार्याधिकारी सॅम्युअल टाँग यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
चिनी पंतप्रधानांशी संवादाचा मान केवळ‘टीसीएसला!
तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या चीनचे पंतप्रधान लि केक्विआंग यांच्या सान्निध्यात एक भारतीय कंपनी म्हणून काही काळ व्यतीत करण्याचा मान केवळ टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेसला मिळाला.
First published on: 22-05-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only tcs got honor to have dialogue with chinis prime minister