परदेशात डॉलरला मिळालेल्या बळकटीमुळे आणि वाढत्या मागणीमुळे रुपया सोमवारी ६१.२१ वर पोहचला. आत्तापर्यंत रूपयाची ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यानंतर काही काळाने त्यामध्ये सुधार होऊन तो ६१.०७ वर पोहोचला. शुक्रवारी रूपया डॉलरच्या तुलनेत ६०.२३ वर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया आजवरच्या सर्वात निच्चांक पातळीवर घसरला आहे. अमेरीकेमध्ये नवीन आर्थिक आकडे सादर झाल्यानंतर डॉलरचा भाव वाढल्याचे दिसत आहे. याचा परिणाम केवळ भारतीय रूपयावरच नव्हे तर इतर चलनांवरही पहावयास मिळत आहे. यापूर्वी ३ जुलैला रुपया ६० च्या खाली आला होता. त्याआधी रूपया २६ जूनला डॉलरच्या तुलनेत ६०.७६ पर्यंत पोहोचला होता.
अमेरिकी अर्थव्यस्थेमध्ये सुधार होण्याच्या कारणामुळे डॉलर मजबूत होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.  
गेल्या वर्षभरात १० जून रोजी पहिल्यांदाच २२ पैशाची घसरण झाली आणि ५७ अंकाच्या जवळ जाताना ५७.०६ या पातळीवर तो येऊन पोहोचला होता.
दरम्यान, मुंबई शेअर बाजारामध्ये सकाळच्या सत्रात २७१ अंकांची घरण होऊन १३९.९९ अंकाची वाढ होऊन पाऊणेअकराच्या सुमारास १९,२२४.९० वर स्थिरावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Re recovers still above 61 mark vs in late morning deals