ऑफिस फर्निचर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘स्टीलकेस’ने त्यांचे भारतातील पहिले निर्मिती दालन पुणे येथे सुरू केले आहे.  स्टीलकेस हा या क्षेत्रातील शंभर वर्षांहून जुना ब्रँड आहे. या कंपनीने भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकताना पुण्यातील चाकणजवळ निर्मिती दालन सुरू केले आहे. ५ हजार चौरस मीटर परिसरामध्ये या दालनाची उभारणी करण्यात आली असून या माध्यमातून १०० जणांना रोजगार मिळणार आहे. याबाबत स्टीलकेस एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष अली ग्विनर यांनी सांगितले की, स्टीलकेसची ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. झपाटय़ाने वाढणारी भारतीय बाजारपेठ उद्योगांसाठी आकर्षण ठरत असली, तरी त्याचप्रमाणे उद्योगांसाठी मोठी स्पर्धाही निर्माण होत आहे.