उन्हाळ्यातील उष्मा असह्य़ बनला आहे, तळपत्या सूर्याची किरणे त्वचेला करपून काढत आहेत. अशा स्थितीत घामेजल्या शरीराला ताजेपणा आणि त्वचेला आरोग्यदायी, मुलायम सुरक्षेचे कवच प्रदान करणारी ‘एक्झॉटिक शॉवर जेल्स’ फियामा डी विल्सने प्रस्तुत केले आहेत. थ्रीडी सस्पेन्शन टेक्नॉलॉजी या प्रभावी विज्ञानाचा वापर करून बनलेले हे शॉवर जेल वापरकर्त्यांना दिवसभरासाठी तजेला देणारा सुवास आणि ऊर्जित त्वचेची अनुभूती प्रदान करतात, ज्या सध्याच्या कडाक्याच्या उन्हाच्या झळांना दूर पळविण्यास उपकारक ठरतात. एक्झॉटिक ड्रीम, क्लीअर स्प्रिंग्ज आणि माइल्ड डय़ू अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांत हे शॉवर जेल सर्वत्र उपलब्ध झाले आहेत.
भयंकर उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांशी सामना करण्याची अतुलनीय क्षमता नाजूक त्वचेला प्रदान करणाऱ्या ‘एसपीएफ १००+’ गुणांनी भरपूर अल्ट्रा सनब्लॉक लोटस हर्बल्स सेफ अॅण्टी-एजिंग क्रीमद्वारे प्रस्तुत झाले आहे. रणरणत्या उन्हाच्या झळांपासून बचावाबरोबर कपाळावरील आठय़ा, स्ट्रेच मार्क्स, तारुण्यपीटिका, डोळ्याभोवती काळी वर्तुळे, त्वचा फिकट पांढरी होणे यांसारख्या त्रासांपासूनही सुरक्षा प्रदान करणारे नैसर्गिक गुणधर्म यात आहेत. हे क्रीम ३० मि.लि. या पॅकमध्ये रु. ७४५ किमतीत निवडक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
सौंदर्यावर घाला घालणाऱ्या उन्हाळ्यात त्वचेसह केसाची काळजीही आवश्यक ठरते. उष्णतेमुळे केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांच्या निवारणासाठी ‘रिचफील’ने ब्राह्मी जब्रॉँडी ऑइल आणि अॅण्टी अॅक्ने पॅक दाखल केले आहे. चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग अर्थात त्वचेच्या पृष्ठभागावरील मृतपेशींचे आवरण काढून टाकण्यासाठी रिचफील अॅण्टी अॅक्ने पॅक हे ५० ग्रॅमच्या पॅकमध्ये १६० रुपयांत उपलब्ध झाले आहे, तर ब्राह्मी आणि जब्राँडीच्या नैसर्गिक गुणांनी युक्त रिचफीलचे नवे तेल आरोग्यपूर्ण व सशक्त केसाची हमी ग्राहकांना देते. हे तेल १०० मिलीकरिता रु. १९९ किमतीत उपलब्ध झाले आहे.
उन्हाळ्यातील त्वचेची काळजी म्हणून शेरिल्स कॉस्मेस्युटिकल्सने ‘क्लॅरिफायअॅक्ने होम केअर किट’ हे तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी तर सर्व प्रकारच्या त्वचांसाठी ‘डर्मालाइट फेअरनेस होम केअर किट’ दाखल केले आहे. शेरिल्स कॉस्मेस्युटिकल्सची (www.cherylsglobal.com) उत्पादने ही केवळ व्यावसायिक सौंदर्यप्रसाधनकर्त्यांसाठी उपलब्ध असून, उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या लक्षात घेऊन सामान्य ग्राहकांसाठी हा घरगुती निगा संच दाखल करण्यात आला आहे.