कंपनीने जून २०१५ साठी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणेच जाहीर केले आहेत. कंपनीने १,९५२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ११८ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ११३% ने जास्त आहे. कंपनीचे पत मापांकन देखील ‘ए+’ वरून ‘एए-’ वर गेले आहे. कंपनीने बाजारात एसयूव्हीसाठी नुकतेच आणलेले रेंजर नावाचे टायर्स उलाढाल आणि नफ्यात वाढ करतील. कंपनीचा विस्तारीकरण प्रकल्प देखील फायदेशीत ठरेल अशी आशा आहे. सध्या ११०-१२० रुपयांच्या आसपास असलेला हा हाय बीटा (१.४) शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
stocksandwealth@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘हाय बीटा’, पण..!
जे के टायर्स ही जे के समूहाची टायर्सचे उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी असून जगातील पहिल्या २५ कंपन्यांत तिचा क्रमांक लागतो.
First published on: 24-08-2015 at 07:52 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: J k tyres and industries ltd shares