नीने आपली उपकंपनी स्थापन केली असून यंदा देखील कंपनीकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. कंपनीने २०१४-१५ च्या पहिल्याच तिमाहीत ४०.१७८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४.५७ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ २७२% आहे. फक्त बीएसईवर नोंदणी असल्याने तसेच केवळ ३ कोटींच भागभांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअर्सची द्रवणीयता कमी आहे. हा लेख लिहितानाच गेल्या दोन दिवसांत हा शेअर जवळपास २७% वर गेला आहे. भरणा झालेल्या भागभांडवलापकी ७४% पेक्षा जास्त शेअर्स प्रवर्तकांकडे असल्याने अतिशय कमी शेअर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे सतत अप्पर/ लोअर सíकट लागण्याचा प्रकार होऊ शकतो. ज्या गुंतवणूकदारांना हा धोका पत्करायची तयारी असेल त्यांनीच गुंतवणूक करावी.
nstocksandwealth@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2015 रोजी प्रकाशित
सर्वश्रुत नाव, संयत कामगिरी
काही कंपन्या जास्त गाजावाजा न करता, कुठलीही जाहिरातबाजी न करता शांतपणे खूप चांगली कामगिरी करत असतात.

First published on: 10-08-2015 at 02:06 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio