फंडाविषयक विवरण
शेअर बाजारात होणाऱ्या एकूण व्यवहारात आर्ब्रिटाज प्रकारचे होणारे व्यवहाराचे खूप मोठे प्रमाण आहे. ‘आर्ब्रिटार्जर्स’ ही जमात बाजाराला आवश्यक रोकडसुलभता देत असते. मागील वर्षी अर्थसंकल्पात रोखे म्युच्युअल फंडांच्या बाबतीत करविषयक नियमांमध्ये मोठे बदल झाले. रोखे म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्याची व्याख्या बदलण्यात आली. एक वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक केल्यास इंडेक्सेशनचा लाभ घेऊन एका वर्षांनंतर मुदत ठेवीपेक्षा थोडा अधिक करमुक्त भांडवली नफा मिळविण्याचा मार्ग बंद झाला. या नियम बदलानंतर आर्ब्रिटाज फंड हा प्रकार आयकराच्या ३० टक्के कर कक्षेत असणाऱ्या गुंतवणूकदारांना सोयीचा वाटला. याचे कारण जर या गुंतवणुकीने नऊ टक्के करमुक्त परतावा दिला तर या गुंतवणूकदारांचा परताव्याचा दर साडेबारा टक्के पडतो.
av-04
अनेक वर्षांपासून उपलब्ध असलेली ही संधी थोडी धोक्याची म्हणून आकर्षक वाटत नव्हती. कारण कमी धोक्याचे एका वर्षांसाठीचे रोखे म्युच्युअल फंड उपलब्ध होते. मागील जुल महिन्यात मांडलेल्या अर्थसंकल्पात रोखे म्युच्युअल फंडाच्या दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या व्याख्येत एका वर्षांवरून तीन वष्रे बदल केला गेल्यामुळे हा साधारण पर्याय आकर्षक वाटू लागला. ३१ मार्च रोजीच्या एनएव्हीनुसार सर्वाधिक वार्षकि परतावा देणाऱ्या फंडाने ९.८७ टक्के तर सर्वात कमी वार्षकि परतावा ८.५६ टक्के दिला आहे. मागील वर्षांत निर्देशांकाची वाटचाल बहुतांश वरच्या दिशेला होती. चालू आíथक वर्षांत निर्देशांकाचा कल हा एकाच दिशेत न राहता वर व खाली असणार आहे. अशा परिस्थितीत आर्ब्रिटाज फंडांचा परतावा मागील वर्षांपेक्षा अधिक असेल हे निश्चित.
भारतात २००७ पासून आर्ब्रिटाज फंडांना सुरुवात झाली. तेव्हा दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आर्ब्रिटाज फंडांसाठी नकारात्मक परतावा देणारा ठरला. २००७ पासून आर्ब्रिटाज फंडांनी दिलेल्या वार्षकि परताव्याची सरसरी १०.७६ टक्के आहे.
सद्य कर नियमांनुसार तीन वर्षांहून कमी कालावधीत मिळविलेला नफा त्या करदात्याच्या त्या वर्षांच्या उत्पन्नाचा एक भाग समजून त्यावर कर आकारणी होते. आर्ब्रिटाज फंड हे समभाग गुंतवणूक करणारे फंड समजले जातात. साहजिक या फंडाच्या ३६६ दिवसांनंतरचा नफा हा दीर्घकालीन नफा समजला जातो. या प्रकारचे फंड समभाग गुंतवणूक करणारे असले तरी हे फंड दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी नसतात. हे फंड रोकड सुलभता असल्यास तात्पुरत्या प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हे फंड आदर्श गुंतवणूक साधन आहेत.
या प्रकारच्या फंडातून तीन महिन्यांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास निर्गमन शुल्क द्यावे लागते. तीन महिने ते ३६६ दिवासांसाठी गुंतवणूक करायची असल्यास या प्रकारच्या फंडांचा विचार केला जातो. पुढील एका वर्षांत ज्या ठळक घडामोडी दिसत आहेत त्यांपकी अमेरिकेत व्याज दर वाढतील असे संकेत आहेत. परंतु प्रत्यक्ष व्याज दर केव्हा वाढतील या विषयी बरीच साशंकता असल्याने व्याजदरवाढीच्या भीतीने निर्देशांक खाली जातात तर हा प्रसंग टळल्यावर पुन्हा उसळी मारतात. असेच देशात केंद्रात सत्तारूढ असलेले सरकार ४५ दिवसांनी एक वर्षांचा कालावधी पुरा करेल. एका वर्षांनंतर उद्योगव्यवसाय क्षेत्रास मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांपकी किती आश्वासनांची पूर्तता झाली याचा हिशेब या वेळी मांडला जाणे अपेक्षित आहे. यावर या सरकारविषयी सामान्यांना किती ममत्व वाटते याचा अंदाज वर्तविण्यात येईल. बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. या निवडणुकांविषयी जसे अंदाज व्यक्त होतील तसा बाजारदेखील हेलकावे खाईल. ही अशाश्वत परिस्थिती आर्ब्रिटाज फंड गुंतवणुकीस आदर्श समजली जाते.
आर्ब्रिटाज – Arbitrage या शब्दाची शब्दकोशातील व्याख्या The simultaneous purchase and sale of an asset in order to profit from a difference in the price अशी आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आपले दोन राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एनएसई आणि बीएसई. भावचंचलता असलेल्या विशिष्ट समभागाची एनएसईवर खरेदी करून त्याची विक्री बीएसईवर करायची आणि दोहोंमधील किमतीतील किंचितशा असणाऱ्या तफावतीचा लाभ घ्यायचा, याला आर्ब्रिटाज म्हणतात. असे व्यवहार करणारे हर एक प्रकारच्या बाजारात असतातच. विशेषत: अनिश्चिततेने घेरलेला शेअर बाजार जर वादळी वध-घटी दर्शवीत असेल, तर असे व्यवहार करणाऱ्यांना म्हणजे आर्ब्रिटाजर्ससाठी अशी परिस्थिती सुसंधीच असते.
mutualfund.arthvruttant@gmail.com
———————————-
(धोक्याची सूचना : हे विवेचन म्हणजे आर्ब्रिटाज फंडात गुंतवणूक करण्याची शिफारस नव्हे. गुंतवणूक करण्याआधी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मत विचारात घेणे गरजेचे आहे.)