गियरच्या एकूण उत्पादन खर्चापकी पन्नास टक्के खर्च कच्च्या मालाचा असतो. इतर स्पर्धक कंपन्यांच्या कच्च्या मालात ८-१०% आयात केलेल्या कच्च्या मालाचा समावेश असतो. मागील वर्षांत रुपयाच्या अवमूल्यनामुळे अनेक स्पर्धक कंपन्यांची नफाक्षमता कमी झाली. तथापि, आयात केलेल्या कच्च्या मालाचे प्रमाण दोन ते तीन टक्के असल्यामुळे रुपया अवमूल्यनाची झळ स्पर्धक कंपन्यांइतकी शांती गियरला पोहोचली नाही. म्हणून तिची नफाक्षमता इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा १० ते १२ टक्क्यांनी अधिक आहे.
गियर उत्पादन हा यंत्र अभियांत्रिकीतील एक विशेष प्रकार आहे. कंपनीचे तामिळनाडू राज्यात कोईम्बतूर येथे एकूण पाच कारखाने असून यामध्ये ओतशाळा (फौंड्री), लोहारकाम (फोìजग) फॅब्रिकेशन, इंजिनीअिरग, अत्याधुनिक टूलरूम व इतर उत्पादन प्रक्रिया सुविधांसाठी आधुनिक यंत्रसामग्रीने युक्त अशा या कारखान्यांतून विविध उत्पादने तयार होतात. याव्यतिरिक्त कंपनीच्या सात पवनचक्क्या असून या पवनचक्क्यांची स्थापित वीजनिर्मिती क्षमता ६.६६ मेगावॅट आहे. कंपनी आपल्या उत्पादन प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली वीज वापरून उर्वरित वीज तामिळनाडू विद्युत महामंडळास विकते.
कंपनीने नियमित म्हणजे ‘स्टँडर्ड’ उत्पादन गटात कॉम्प्रेसर, विमान उत्पादन, क्षेपणास्त्रात वापरण्यासाठी नवीन उत्पादने विकसित केली आहेत. याचा परिणाम कारखान्यांची उत्पादन कार्यक्षमता वाढण्यात झाला आहे. या नवीन विकसित केलेल्या उत्पादनांमुळे नवीन ग्राहक जोडले जातीलच, परंतु ही सर्व उत्पादने ‘क्रिटिकल’ अर्थात अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या उत्पादनांची नफाक्षमता कंपनीच्या इतर उत्पादन गटात सर्वाधिक आहे.
जागतिक गियर बाजारपेठेत ४० टक्के सहभाग हा आशियातील उत्पादकांचा आहे. भारतातील गियर उद्योगाची व्याप्ती दहा हजार कोटींची आहे. गियर उद्योगातील एकूण क्षमतेपकी तीस टक्के क्षमता वाहन उद्योगासाठी तर उर्वरित औद्योगिक वापरासाठी कामी येते. वाहन उद्योग हा गियर उत्पादकांचा मोठा ग्राहक आहे. शांती गियर आपल्या उत्पादनांची झेडएफ स्टियिरग, ऑटोमोटिव्ह अॅक्सेल आदी उत्पादकांना विक्री करते. हे उत्पादक ‘शांती’चे सुटे भाग वापरून जुळणी केलेली उत्पादने टाटा मोटर्स, मिहद्र, फोर्ड, िहदुस्थान मोटर्स, अशोक लेलँड आदी वाहन निर्मात्यांना विकते. वाहन उद्योगाची वाढ ही स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाढीशी साधम्र्य साधणारी असते. नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात रिझव्र्ह बँकेला २०१६ मध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर सहा टक्के राहणे अपेक्षित आहे. शिवाय नवीन सरकारची स्थापना झाल्यावर सरकारकडून औद्योगिक वाढीला पूरक पावले टाकली जाणे अपेक्षित आहे. पुढील वर्षी स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाढ ही वाहन उद्योगाचे मागील तीन वर्षांचे नष्टचर्य संपविणारी असेल, असे मानले जाते. याचा अप्रत्यक्ष लाभार्थी शांती गियर्स असेल.
शांती गियर्स लि.
” ७२.६०
वार्षिक उच्चांक/नीचांक: ” ७५.९०/ ४७.५५
पुस्तकी मूल्य: ” ३१.५२ दर्शनी मूल्य: “१
ईपीएस: ” २.०४ पी/ई: ३५.७४ पट
मूल्यांकन : सध्याच्या भावानुसार उत्सर्जनाचे किमतीशी गुणोत्तर २०.१८ पट आहे. डीसीएफ पद्धतीने २०१६ मध्ये उत्सर्जन ४.३५ अपेक्षित आहे. या उत्सर्जनाचे आजच्या किमतीशी गुणोत्तर १५.३५ पट आहे. कंपनी ३१ मार्च २०१४ रोजी संपलेल्या आíथक वर्षांचे लेखापरीक्षित निकाल जाहीर करणार आहे. हे निकाल मागील तीन वर्षांपेक्षा सरस असतील, असा अंदाज बांधायला मोठा वाव आहे. दोन वर्षांनंतर ८८ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी केल्यास २७% भांडवली नफा कमविणे शक्य आहे.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2014 रोजी प्रकाशित
शांती गियर्स- जुना भिडू नवा डाव
शांती गियर्स लिमिटेड ही कंपनी दक्षिण भारतात विस्तार असलेल्या मुरुगप्पा समूहाचे एक अंग आहे. या कंपनीची गियर्स, गियर बॉक्स, गियर मोटार ही उत्पादने आहेत.
First published on: 21-04-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shanti gears ltd