ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या ग्रहाच्या राशी संक्रमणाचा किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी होणाऱ्या संयोगाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. यंदा सर्वपित्री अमावस्या २५ सप्टेंबर रोजी आहे. त्याच वेळी या दिवशी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच, या दिवशी कन्या राशीमध्ये चार ग्रहांचा विशेष संयोग तयार होत आहे. या संयोगामध्ये बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण योगदेखील समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत तीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मेष

सर्वपित्री अमावस्या तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. तुम्हाला पूर्वज आणि ग्रहांचे भरपूर आशीर्वाद मिळतील. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. करिअरमध्ये आणि व्यवसायात जी काही आव्हाने येत असतील, ती तुम्ही पार करून यशाची शिखरे गाठाल. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. दुसरीकडे, तुमच्या संक्रमण कुंडलीच्या नवव्या घरात बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तयार होतील. त्यामुळे तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली सर्व कामे मार्गी लावली जातील.

Numerology: खूपच नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कुटुंबासाठीही ठरतात अत्यंत भाग्यवान

  • वृषभ

बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तुमच्या संक्रमण कुंडलीत पाचव्या घरात तयार होणार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी शुक्राचा संयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. कला क्षेत्राशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ खूप छान असणार आहे. दुसरीकडे, प्रेम संबंधांमध्ये तुम्हाला यश मिळेल.

  • सिंह

बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण तुमच्या संक्रमण कुंडलीत दुसऱ्या घरात तयार होत आहेत. दुसरीकडे, सर्वपित्री अमावस्येला कन्या राशीतील चार ग्रहांचा संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभाचे योग बनतील. तसेच गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच, ज्या लोकांचे करिअर भाषण क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ उत्कृष्ट सिद्ध होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A wonderful combination of four planets forming on sarvapitri amavasya wealth will be showered on the people of zodiac sign taurus leo aries pvp