23 October 2018

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

#MeToo : विकास बहल यांना आणखी एक दणका , ‘IFTDA’ ची कारणे दाखवा नोटीस

या नोटीसला उत्तर दिलं नाही तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे.

पाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत

भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

Amritsar Railway Accident: सिद्धू यांनी ट्रेनच्या स्पीडवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित, पत्नीचा बचाव

जोडा रेल्वे फाटकाजवळ ट्रेनचा वेग नेहमीच कमी असतो असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे

पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, भाजपाच्या सरपंचाविरुद्ध गुन्हा

विशाल ढोरे यांच्या हत्येसाठी १० लाखाची सुपारी घेतली होती आणि या बाबत मांजरी गावचे सरपंच शिवराज घुले आणि प्रमोद कोद्रे यांच्याशी फोन वर बोलणे झाले होते, अशी माहिती त्या तिघांनी पोलिसांना दिली.

पेट्रोल, डिझेल सलग सहाव्या दिवशी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसात मुंबईत पेट्रोलचे दर १ रुपये ४९ पैशांनी तर डिझेलचे दर ८५ पैशांनी कमी झाले आहे.

देशभरात फटाकेविक्रीवर बंदी?, सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय

गेल्या वर्षी दिल्ली आणि लगतच्या भागात फटाक्यांच्या विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे कोर्टाने हा निर्णय दिला होता.

…तोवर राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही: शिवसेना

जगभरातील देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी मोदींनी परदेश दौरे केल्याचा दावा केला जातो. पण या मोबदल्यात भारताला काय मिळाले?

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षकाला कारने चिरडले

दौलताबाद परिसरात खासगी शिकवणीवर शिक्षक तसेच विट भट्टीचा व्यवसाय असलेले भानुदास जाधव हे पहाटे त्यांच्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.

चलो अयोध्या! संजय राऊत योगी आदित्यनाथांच्या भेटीला

राम मंदिर रखडल्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती.

राज ठाकरे, नाना पाटेकरांनी भाव न दिल्याने तनुश्रीने मला लक्ष्य केले: राखी सावंत

‘मी टू’ मोहिमेचा मार्ग भरकटत असून ज्यांच्यासोबत काही झालंच नाही ती लोकंही आरोप करत आहेत. आपण पुरुषांची बाजूही ऐकून घेतली पाहिजे, असे राखीने म्हटले आहे.

#MeToo: ए. आर. रेहमान म्हणतात; मोहिमेला पाठिंबाच, पण…

अभिनेते आलोकनाथ, संगीतकार अनु मलिक, गायक कैलाश खेर, दिग्दर्शक साजिद खान, विकास बहल अशा दिग्गज मंडळींची नावे या प्रकरणात उघड झाली.

prabhas

#HappyBirthdayPrabhas : प्रभासला अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर

अभिनय क्षेत्रात नावारुपास आलेला हा अभिनेता एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न पाहात होता.

गोव्यात जाऊन जुगार खेळणाऱ्यांसाठीच आंग्रीया क्रूझ: नीलेश राणे

मध्यमवर्गीय व पर्यटनासाठी या क्रूझचा उपयोग शून्य’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २३ आक्टोबर २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

पैशांचे काम असले की सत्तेतून बाहेर पडायच्या धमक्या; राज ठाकरेंचा शिवसेनेवर नेम

गुराढोरांना चारा नाही, पण शिवसेनेला राममंदिराची काळजी आहे. शिवसेना सत्तेत आहे, पण तरीही ते सरकारवर टीका करतात. उद्धव ठाकरे काय बोलतात कळतंच नाही.

suicide

‘प्रधानमंत्री आवास योजने’पासून वंचित, बुलढाण्यात हतबल तरुणाची आत्महत्या

“दोन वर्षांपासून संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाने नुसते खेटे घालायला लावले. त्यामुळे माझी ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या आहे”

World Wrestling Championship 2018: बजरंग पुनियाला रौप्यपदक

२०१३च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या बजरंगला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. ६५ किलो वजनी गटात त्याच्यावर भारताची भिस्त होती.

येरवड्यात वकिलावर गोळीबार

या गोळीबारात वकील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

प्रियंका गांधी कुठे हरवल्या? असं विचारणारं पोस्टर रायबरेलीत!

काही अज्ञातांनी ही पोस्टर्स लावली असल्याची माहिती समोर येते आहे

एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांकडून दिवाळीचं गिफ्ट

एसटी कर्मचाऱ्यांना २५०० तर अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये  दिवाळी भेट म्हणून दिले जाणार आहेत

पेटीएम मालकाला ब्लॅकमेल करून २० कोटी मागणारी महिला सेक्रेटरी अटकेत

महिला शर्मा यांची सेक्रेटरी म्हणून काम करते तिच्यासह तिघांना अटक करण्यात आली, चौथा कर्मचारी फरार आहे असेही समजते आहे

rangana herath

श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेरथचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यानंतर घेणार निर्णय

हुंड्यासाठी सुनांना विकले, सासरचे फरार

२०१५ मध्ये या दोन बहिणींचे लग्न झाले होते हुंड्यासाठी त्यांना विकण्याचा प्रकार घडला ज्यानंतर त्यांच्या सासरचे लोक फरार आहेत