Aries Astrological Predictions January 31 2025 : आज ३१ जानेवारी २०२५ (शुक्रवार) रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी ३० जानेवारी रोजी दुपारी ०४ वाजून १० मिनिटांनी सुरू झाली असून ३१ जानेवारी दुपारी ०१ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असेल, त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. तसेच आज शतभिषा नक्षत्र जागृत असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी पंचांगानुसार, माघ महिना सुरू झाला असला आहे. हा महिना धार्मिक कार्य आणि शुभ कार्यांसाठी खूप शुभ मानला जातो. तसेच आजचा दिवस जानेवारी महिन्यातील शेवटचा दिवस आहे त्यामुळे हा दिवस कोणत्या राशीसाठी उत्तम जाईल हे आपण जाणून घेऊ

मेष राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Aries people?)

आजच्या दिवस तुमच्यासाठी खूप खास असेल. भाग्याची साथ मिळेल आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. परंतु तुमच्या मेहनतीचे गोड फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. आर्थिक निर्णय योग्य असतील. समाजसेवेची आवड राहील. घरगुती वातावरण आनंदी असेल. मानसिक समाधान लाभेल. धार्मिक कार्य पार पाडाल. एकूणच हा सप्ताह भाग्योदयाचा असेल.आरोग्य उत्तम राहील.

मेष राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Aries Finance Horoscope Today)

आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. परंतु खर्चही वाढतील. कुठेही गुंतवणूक करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.

मेष राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Aries Career Horoscope Today)

आजच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. व्यावयायिक प्रवास घडतील. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवी नोकरी मिळू शकते.

मेष राशीचे आजचे नातेसंबंधांविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Aries Love Horoscope Today)

मेष राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण होईल. नातेवाईकांकडून मदत मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aries horoscope today 31 january 25 daily astrology prediction for aries career finance money and love sap