हिंदू कॅलेंडरनुसार, आषाढ हा वर्षाचा चौथा महिना आहे, जो १५ जूनपासून सुरू झाला असून १३ जुलैपर्यंत चालू राहील. जुलैमध्ये गुरुपौर्णिमेला त्याची सांगता होईल. या महिन्यात येणारी अमावस्या आषाढ अमावस्या म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूशी संबंधित देवशयनी एकादशी आणि गुप्त नवरात्रीसारखे मोठे सणही याच महिन्यात येतात. असे मानले जाते की महिन्याच्या सुरुवातीला भगवान विष्णू चार महिने झोपी जातात आणि नंतर देव उठणीलाच जागे होतात. या महिन्यात पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याची अमावस्या २८ जून रोजी येत आहे आणि हिंदू कॅलेंडरनुसार तिची वेळ पहाटे ५ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ जून रोजी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढ अमावस्येला काही ज्योतिषीय उपाय करून तुम्ही पितृ दोष सहज दूर करू शकता. अनेक वेळा, पितर रागावले तर प्रगतीत अडथळे येतात, शारीरिक अडचणी येतात, घरात कलह, गरिबीचे वातावरण निर्माण होते. लोकांना याची कल्पनाच नसते की त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे पितर नाराज झालेले असतात. आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब आषाढ अमावस्येला करून तुम्ही तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणू शकता.

जुलै महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांवर होणार कुबेराची कृपा; अचानक मोठा धनलाभ होण्याचे संकेत

  • आषाढ अमावस्येला श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो आणि मोक्षही प्राप्त होतो, असे सांगितले जाते. जन्मकुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी, अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करा. यावेळी तुम्हाला गंगाजल वापरावे लागेल. यानंतर पूजा करून पितरांना खीर आणि पुरी अर्पण करा.
  • आषाढ अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष दूर होतो असे म्हणतात. यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि आपल्यासोबत धागा, दूध, पाणी आणि साखर घेऊन जा. प्रथम धागा पिंपळाभोवती गुंडाळा आणि नंतर सर्व वस्तू अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने केवळ पितरच नाही तर कुंडलीतून सर्व प्रकारचे दोष दूर होतात.
  • तुमच्या कुंडलीत पितृदोष आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाशी संबंधित दुसरा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला पिंपळाचे झाड लावावे लागेल. कुठेतरी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची नित्य काळजी घ्या. तुमची ही पद्धत पितरांना प्रसन्न करू शकते असे शास्त्रात सांगितले आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadha amavasya 2022 how to remove pitru dosh the measures taken on this day will be beneficial pvp
First published on: 27-06-2022 at 10:04 IST