Budh Asta 2023 Vipreet Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह सध्या कन्या राशीत असून येत्या रविवारी म्हणजेच ८ ऑक्टोबरला बुध अस्त होणार आहे. एखाद्या ग्रहाच्या अस्त व उदयाचा प्रभाव हा १२ राशींवर कमी अधिक व शुभ- अशुभ प्रमाणात होतच असतो. मुळात अस्त होणे म्हणजे एखादा ग्रह जेव्हा सूर्याच्या अधिक जवळ जातो तेव्हा त्याचा अस्त होत आहे असं म्हटलं जातं. बुध ग्रह सूर्याच्या अधिक जवळ पोहोचल्याने बुध-सूर्य युतीने तयार झालेला बुधादित्य राजयोग आणखी शक्तिशाली होण्याची चिन्हे आहेत. तर या बुध अस्तानंतर विपरीत राजयोग सुद्धा निर्माण होणार आहे. दोन राजयोग एकत्र प्रभावी असल्याने तीन राशींच्या भाग्यात प्रचंड धनप्राप्ती होण्याची चिन्हे आहेत. अगदी कोट्याधीश व्हायचं नशीब असलेल्या या राशी कोणत्या चला पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विपरीत व बुधादित्य राजयोग बनणार; १६ दिवस तुमचीही चांदी

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

ज्योतिष शास्त्रानुसार विपरीत राजयोग हा मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या गोचर कक्षेत सहाव्या स्थानी अस्त होणार आहे. अशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात धनलाभ व्हायची शक्यता आहे कारण मुळात बुध हा धन- वैभव व बुद्धीचा दाता म्हणून ओळखला जातो. तुमच्या बुद्धीच्या जोरावर म्हणजेच योग्य गुंतवणूक, व्यायवसायात योग्य नियोजन यामुळे तुम्ही कोट्याधीश होऊ शकता. आपल्या राशीच्या कुंडलीत बुध हा तिसऱ्या स्थानाचा स्वामी आहे. यामुळे तुम्हाला येत्या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास व पराक्रम गाजवण्याची इच्छाशक्ती प्रबळ झालेली दिसेल.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

बुध ग्रह अस्त होताच कर्क राशीत विपरीत राजयोग प्रभावी होणार आहे. कर्क राशीसाठी येणारा कालावधी हा सोन्याहून पिवळा सुखाचा काळ ठरू शक्ती. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत बुध १२ व्या व तिसऱ्या स्थानाचा स्वामी आहे. यामुळे ज्यांची सध्या बुध महादशा सुरु आहे त्यांना सुद्धा या काळात अपार पैसा व श्रीमंती लाभण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशी माध्यमातून सुद्धा धनलाभ होऊ शकतो. अडकलेले काम मार्गी लागेल व त्यातूनच धनप्रवाह सुद्धा वाढेल. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी हा कालावधी लाभदायक ठरू शकतो.

हे ही वाचा<< बुध ग्रहाने भद्र राजयोग बनवल्याने ऑक्टोबर महिन्यातच होईल दिवाळी! ‘या’ राशींवर वैभव व धनलक्ष्मी होईल प्रसन्न

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार विपरीत राजयोगामुळे आनंद अनुभवू शकणारी तिसरी रास म्हणजे वृश्चिक! बुध देव आपल्या राशीच्या अर्थी मिळकतीच्या स्थानी अस्त होणार आहे तर मुळात बुध आपल्या राशीत आठव्या स्थनाचा स्वामी आहे. या कालावधीत तुमचे आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. मागील काही वर्षात एखाद्या चुकीमुळे जे पैसे तुम्ही गमावून बसला होतात तेच आता एखाद्या नव्या रूपात तुमच्याकडे परत येऊ शकतात. सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budha asta in kanya rashi to make budhaditya vipreet rajyog strongest these rashi to earn crores money till 24 october 2023 svs