Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक महान त्वत्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. चाणक्य नीती हे जगप्रसिद्ध आहे. चाणक्य यांच्या या नीती चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक जण आजही त्यांच्या नीतीचा अवलंब करतात आणि आयुष्यात खूप पुढे जातात. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये विविध पैलूंविषयी सांगितले. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिद्वारे आयुष्य उत्तम जगण्यासाठी काही महत्त्वाची गोष्टी सांगितल्या आहे. आज आपण लोकांनी कोणत्या ठिकाणी जाऊ नये, याविषयी जाणून घेणार आहोत. आचार्य चाणक्य सांगतात असे काही ठिकाण आहेत जिथे गेल्यानंतर आयुष्यात अडचणी वाढू शकतात तसेच यश मिळवण्यात अडचण निर्माण होऊ शकते. जाणून घेऊ या, चाणक्य नीतिनुसार कोणत्या ५ ठिकाणी जाऊ नये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिने मान सन्मान मिळत नाही

प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान पाहिजे असते. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे लोक तुमचे किंमत ठेवत नाही, तुमच्या गोष्टी ऐकत नसेल किंवा अपमान करत असेल तेव्हा त्या ठिकाणी राहण्याचा काहीही फायदा नाही. अशा वेळी तुमचा मान सन्मान दुखावला जाऊ शकतो त्यामुळे अशा ठिकाणाहून दूर राहणे चांगले आहे.

जिथे रोजगार नाही

पैशाशिवाय आयुष्य जगणे खूप कठीण आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी राहात असाल तिथे नोकरी किंवा रोजगाराच्या संधी नाहीत, अशा ठिकाणी राहून संघर्ष करावा लागतो. चाणक्य सांगतात की एखादे ठिकाण कितीही सुंदर असेल तरी तिथे उपजीविकेचे साधन नसेल तर तिथे राहणे व्यर्थ मानले जाते.

जिथे आपले लोक नसतील

जर तुम्हाला कोणतीही अडचण येत नसेल तर तु्म्ही अनोख्या ठिकाणी राहू शकता पण कठीण प्रसंगात तुम्ही जर एकटे असाल आणि तुम्हाला मदत करणारे कोणी नसेल तर अशा ठिकाणी वेळ वाया घालवू नका. त्यामुळे चाणक्य सांगतात की जिथे मित्र आणि नातेवाईक नाहीत, अशा ठिकाणी जास्त वेळ राहू नये.

जिथे शिक्षणाचे वातावरण नाही

जीवनात पुढे जाण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे शिक्षणाला महत्त्व नाही, तिथे राहूनही तुम्ही प्रगती करू शकत नाही. चाणक्य यांच्या मते, अशा ठिकाणी राहू नये.

जिथे लोकांमध्ये चांगले गुण नसतील

जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहत असाल, जिथे लोक चांगले नसतील. लोक खूप वाईट गोष्टी करतात, लोक खोटे बोलतात, एकमेकांची फसवणूक करतात अशा ठिकाणी थांबू नका. या वाईट संगतीचा तुमच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti acharya chanakya said never go these five places otherwise life become more problematic ndj