Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी ‘चाणक्य नीती’मध्ये मनुष्याचे आयुष्य सोपे आणि यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीती जगप्रसिद्ध आहेत. अनेक राजकारणी, व्यावसायिक त्यांच्या नीती आचरणात आणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाणक्य अर्थशास्त्रामध्ये तज्ज्ञ होते. चाणक्य यांच्या मते, काही लोकांना मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा लोकांवर माता लक्ष्मी नेहमी नाराज असते. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

  • चाणक्य सांगतात की, यशस्वी होण्यासाठी अनेक जण खूप काही योजना तयार करतात; पण त्या योजनांची अंमलबजावणी करीत नाहीत. या लोकांनी सकारात्मक विचारसरणी आत्मसात करायला पाहिजे.

हेही वाचा : Dal Rice : वरणभात खाण्याचे फायदे माहीत आहेत? वाचा एका क्लिकवर …

  • चाणक्य नीती सांगते की, जे लोक कोणताही विचार न करता कामे करतात, ते यशापासून खूप दूर राहतात आणि संकटाच्या वेळी समस्या सोडवू शकत नाहीत.
  • चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, जे लोक वेळेचा विचार न करता, आपल्या क्षमतेपलीकडे काम निवडतात, त्यांना मेहनत करूनही यश मिळत नाही आणि आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

हेही वाचा : महिलांना अजिबात आवडत नाही पुरुषांच्या ‘या’ सवयी? कोणत्या ते जाणून घ्या

  • चाणक्य सांगतात की, काही व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना लवकर यश मिळत नाही. लक्ष्मी माता त्यांच्यावर खूप नाराज असते.
  • जर एखादी व्यक्ती भविष्याचा गरजेपेक्षा जास्त विचार करीत असेल, तर ती व्यक्ती वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना मेहनत करूनही यश मिळत नाही.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti acharya chanakya said these people never get success after doing so much hardwork mata lakshmi is always sad ndj