Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती मध्ये जीवनातील अनेक गोष्टी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने सांगितल्या आहेत. धर्म, न्याय, संस्कृती, राज्यकारभार, अर्थशास्त्र आणि शिक्षण याबद्दलचे त्यांचे विचार आजही तितकेच उपयोगी आहेत जितके ते पूर्वी होते.
चाणक्य यांचे म्हणणे होते की त्यांच्या सांगितलेल्या नियमांचे पालन केले तर माणूस कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो आणि यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. चाणक्य नीती मध्ये एका श्लोकातून त्यांनी पाच अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्याची माणसाने कधीही लाज वाटून घेऊ नये. या गोष्टींमध्ये लाज वाटली तर त्या आपल्या प्रगतीस अडथळा ठरतात.
चाणक्यांचा श्लोक (Chanakya Shlok)
धनधान्य प्रयोगेषु विद्या सङ्ग्रहेषु च।
आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जः सुखी भवेत्॥
आचार्य चाणक्य या श्लोकातून सांगतात की धन आणि धान्याचे व्यवहार, विद्या मिळवणे, जेवणे आणि आपसातील वागणूक यात लाज न बाळगणारा माणूस नेहमी सुखी राहतो. म्हणून हे काम करताना लाज सोडावी.
‘ती’ ५ कामे ज्यात कधीही लाज बाळगू नये
धन आणि अन्न यांचे व्यवहार: पैसे किंवा धान्य देताना-घेताना संकोच करू नये. व्यवहार करताना अडखळलो तर आर्थिक तोटा होऊ शकतो.
उधार दिलेले पैसे परत मागणे: चाणक्य म्हणतात की दिलेले पैसे मागताना लाज वाटणे हे स्वतःसाठीच नुकसानकारक ठरते. गरज पडली तर तुमच्याकडे पैशांची कमी भासू शकते.
विद्या मिळवणे: चाणक्यांच्या मते शिकताना प्रश्न विचारताना संकोच केला, तर ज्ञान अपूर्ण राहू शकते. म्हणून शिक्षकांना न घाबरता प्रश्न विचारावेत, म्हणजे शिकणे पूर्ण होईल.
जेवण करणे: आचार्य चाणक्यांच्या मते जेवताना संकोच करणे म्हणजे उपाशी राहण्यासारखे आहे. गरज आणि संधी मिळाल्यावर लाज न बाळगता जेवले पाहिजे. यामुळे माणूस आनंदी राहतो.
संवाद आणि वागणूक: चाणक्य नीतीनुसार आचार्य चाणक्य सांगतात की आपसात बोलताना किंवा वागताना संकोच ठेवला तर नाती कमजोर होतात. स्पष्ट, नम्र आणि मनमोकळेपणाने बोलल्याने नाती मजबूत होतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)