Chanakya Niti for Successful Life: आचार्य चाणक्य हे जगातील महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये व्यावहारिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना आजही महत्त्व आहे. या गोष्टींचा अवलंब केल्यास अनेक समस्या आणि संकटे टळू शकतात. आज आपण चाणक्य नीतीमध्ये उल्लेख केलेल्या अशा लोकांबद्दल जाणून घेत आहोत, ज्यांच्यापासून दूर राहणेच आपल्यासाठी चांगले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की या लोकांसोबत कधीही राहू नका कारण ते तुम्हाला कधीही फसवू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला आनंदी-यशस्वी जीवन जगायचे असेल आणि स्वतःला संकटांपासून वाचवायचे असेल तर काही लोकांपासून दूर राहणे चांगले आहे. चला जाणून घेऊया चाणक्य नितीमध्ये कोणत्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जास्त गोड बोलणारे लोक

असे लोक जे नेहमी जास्त गोड बोलतात, विनाकारण तुमची स्तुती करतात, अशा लोकांपासून सावध रहा. असे लोक आपला हेतु साधण्यासाठी तुमच्याशी चांगले बोलून कधीही फसवू शकतात. जराही विचार न करता ही लोक कधीही विश्वासघात करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर रहा.

( हे ही वाचा: शनिदेवाने मकर राशीत गोचर करत बनवला केंद्र त्रिकोण राजयोग! ‘या’३ राशींना प्रगतीसोबत होईल प्रचंड धनलाभ)

आपल्या बोलण्यावर ठाम नसलेली लोक

जे लोक नेहमी मोठी आश्वासने देतात परंतु कोणतीही आश्वासने पूर्ण करत नाहीत त्यांच्यापासून दूर रहा. अशी माणसे तुमचा कधीच उपयोगात येणार नाहीत, उलट संकटाच्या वेळी तुमची साथ सोडतील.

विश्वासघातकी लोक

हे लोक ओळखणे थोडे कठीण आहे कारण ते तुमच्या समोर तुमच्या शुभचिंतकासारखे वागतात पण तुमचे नुकसान करण्यात, तुमच्या मागे तुमची प्रतिमा खराब करण्यात व्यस्त असतात. अशा लोकांना ओळखा आणि लगेच त्यांच्यापासून दूर राहा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says always stay away from these people they can cheat anytime gps