Premium

Chandra Grahan 2023 : वर्षातील दुसरं चंद्रग्रहण केव्हा आहे माहित्येय का? जाणून घ्या वेळ आणि भारतात ते दिसणार का?

Second Lunar Eclipse 2023 : अनेकांना वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कधी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने खगोलप्रेमींची ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहचली आहे.

second chandra grahan 2023 date & time in India
२०२३ चं पहिलं चंद्रग्रहण(Photo: freepik)

second lunar eclipse 2023 : खगोलशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. खगोलशास्त्रात ग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. वर्षभरात दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे अशी मिळून चार ग्रहणे असतात. यापैकी आत्तापर्यंत एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण झाले आहे. या वर्षीतील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी झाले आणि चंद्रग्रहण ५ मे रोजी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले. आता पुढील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची पाळी आहे. आत्तापर्यंत दोन ग्रहणे झाली पण यातील एकही भारतात दिसले नाही. यामुळे त्यांचा सुतक काळ विचारात घेतला गेला नाही. मात्र आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार असून ते भारतातही दिसणार आहे, तसेच याचे परिणामही दिसून येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण कधी असेल?

जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण रविवार २९ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. हे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असून ते खूप खास असणार आहे, कारण संपूर्ण वर्षभर भारतात दिसणार्‍या सर्व ग्रहणांपैकी हे एकमेव ग्रहण असेल. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सुतक कालावधीही वैध असेल. २०२३ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतात २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०१.०६ वाजता सुरू होईल आणि ०२.०० वाजता समाप्त होईल. भारतातील या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी १ तास १६ मिनिटे असेल

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandra grahan 2023 second lunar eclipse second chandra grahan 2023 date time in india lunar eclipse timing sutak sjr

First published on: 18-05-2023 at 20:00 IST
Next Story
Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १९ मे २०२३