मेष

आज प्रदोष आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. लक्ष्मी अष्टक पठण करणे.
आजचा रंग – गडद निळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

आज प्रदोष आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची आज सुरुवात होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकेल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज प्रदोष आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा.
आजचा रंग – सोनेरी

कर्क

आज प्रदोष आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – लाल

सिंह

आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गुलाबी

कन्या

संमिश्र लाभाचा दिवस. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाला जपून करावी. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

तुळ

सर्व प्रकारच्या लाभांसाठी चांगला दिवस आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. देवी कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – फिकट पिवळा

वृश्चिक

संमिश्र लाभाचा दिवस. वादविवाद टाळावेत. व्यवसाय नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी सावधपणे निर्णय घ्यावे. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

धनु

दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन ओटी भरावी.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

मीन

कौटुंबिक सौख्य जाणवेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 10 march