- मेष:-
कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी असेल. काही वेळेस समंजसपणा दाखवावा. आरोग्यात सुधारणा होईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. - वृषभ:-
आवडत्या गोष्टी करण्यावर लक्ष द्याल. दिवस मजेत घालवाल. आवडत्या छंदात मन रमेल. गृह-सौख्याकडे लक्ष द्यावे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. - मिथुन:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. जुनी देणी चुकती करा. फार काळजी करण्याचे कारण नाही. पराक्रमाला वाव आहे. सारासार विचार करून कामे करावीत. - कर्क:-
तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावेत आर्थिक स्थैर्य लाभेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. - सिंह:-
कामात उतावळेपणा करू नका. ध्येय साध्य करण्याकडे लक्ष द्यावे. चटकन रागवू नका. धडाडीने कामे हाती घ्याल. मागचा पुढचा विचार करून कृती करावी. - कन्या:-
गैर-समजुतीतून वाद वाढवू नका. डोळ्यांची तपासणी करावी. पायाच्या इजेकडे दुर्लक्ष करू नका. काही कामांत अधिक वेळ अडकून पडाल. प्रवासात सावधानता बाळगावी. - तूळ:-
मनातील प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्याल. सतत खटपट कराल. सर्वांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक लाभावर लक्ष केंद्रित कराल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. - वृश्चिक:-
कामातील अनपेक्षित बदल समजून घ्यावेत. हातातील अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. सेल्समन लोकांना फायदा संभवतो. हुकुमशाही वृत्ती बाजूस सारावी. जलदगतीने कामे कराल. - धनु:-
कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना सावधगिरी घ्यावी. उपासनेला अधिक बल मिळेल. स्व-कष्टावर अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांचा ससेमिरा मागे लागेल. - मकर:-
महिलांनी तब्येतीस जपावे. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. उष्णतेचे विकार जाणवू शकतात. काटकसरीने वागावे. - कुंभ:-
जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. काही वेळेस तारेवरची कसरत करावी लागेल. क्षुल्लक कारणांवरून रागवू नका. स्वभाव विरोध दर्शवू नका. वैवाहिक सौख्य जपावे. - मीन:-
कापणे, भाजणे यांसारखे त्रास संभवतात. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अधिक चिकाटीने कामे कराल. पचनाची तक्रार जाणवू शकते. इतरांच्या वागण्याचा त्रास करून घेऊ नका.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 20-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 20 september 2019 aau