- मेष:-
शैक्षणिक कामे पार पडतील. आपल्याच मतावर ठाम राहाल. जुगारात यश येवू शकते. तुमच्यातील आनंदीवृत्ती दिसून येईल. खेळकरपणाने सर्वांना जिंकून घ्याल. - वृषभ:-
घरातील वातावरण उल्हासीत असेल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. पैज जिंकता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. - मिथुन:-
प्रवासाचा आनंद घ्याल. चांगले साहित्य वाचायला मिळेल. मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन विषयात रुची दाखवाल. चलाखीने कामे कराल. - कर्क:-
आवडते पदार्थ खायला मिळतील. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल. व्यापाऱ्यांना चांगला धनलाभ संभवतो. नवीन गोष्टी शिकण्यात लक्ष घालाल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. - सिंह:-
दिवस मनासारखा व्यतीत कराल. तुमच्यातील कला लोकांसमोर सादर करता येईल. हितशत्रूंवर विजय मिळवाल. मुलांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. - कन्या:-
काही गोष्टी आपापसात मिटवाव्यात. उगाचच खोडसाळपणा करू नका. कलाकुसरीवर लक्ष द्याल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. मनात नसतांना प्रवास घडेल. - तूळ:-
तुमची प्राप्ती वाढेल. कामाचा प्रसार करता येईल. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. दूरचा प्रवास टाळावा लागेल. - वृश्चिक:-
केलेल्या कामाचे चीज होईल. मिळकत व खर्च यांची सांगड घालावी लागेल. महिलांना चांगले लाभ संभवतात. कौटुंबिक कलह चर्चेने सोडवावेत. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. - धनु:-
आजारातून हळूहळू बरे वाटू लागेल. बदलीची चन्हे दिसू लागतील. वाताचे विकार त्रास देवू शकतात. शत्रूंवर विजय मिळविता येईल. महिलांना बाहेरील कामे अधिक करावी लागतील. - मकर:-
वारंवार प्रवासाचा योग येईल. काही गोष्टी वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपडाल. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवावे. शारीरिक कष्ट वाढू शकतात. मनातील चुकीचे ग्रह दूर करावेत. - कुंभ:-
गुद्मार्गाचे विकार उद्भवू शकतात. विरोधकांचा समाचार घेतला जाईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. वेळेवर औषधोपचार करावेत. चढाओढीत भाग घेवू नका. - मीन:-
हातात नवीन अधिकार येतील. काही कामांसाठी पैसा वापरावा लागेल. अधिकाराचा योग्य कामासाठीच वापर करावा. अनावश्यक खर्च टाळावा. धार्मिक यात्रेचा योग येईल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 27-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 27 september 2019 aau