- मेष:-
संयम सोडून चालणार नाही. तुमच्या हतबलतेचा इतरांना फायदा होवू शकतो. अतिउत्साह चांगला नाही. शांततेचे धोरण ठेवावे लागेल. प्रेमसंबंधात सावधानता बाळगावी. - वृषभ:-
कौटुंबिक गोष्टीत अधिक लक्ष घालावे. चांगले वाहन सौख्य लाभेल. जमिनीची कामे पार पडतील. गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. - मिथुन:-
कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. अधिकाराचा वापर कराल. अधिक जबाबदारीने वागाल. प्रवासात काळजी घ्यावी. मैत्रीतील कटुता टाळावी. - कर्क:-
सारासार विचार करुन बोलावे. वायफळ खर्च टाळावा. चोरांपासून सावध राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल. - सिंह:-
महत्त्वकांक्षा वाढेल. काही कामात अडचण येवू शकते. भावनेच्या आहारी जावू नका. अधिकारवाणीने आपले स्थान प्रस्थापित कराल. संयम सोडू नका. - कन्या:-
एककल्ली विचार करु नका. वायफळ बडबड करु नये. सार्वजनिक गोष्टींचे भान राखावे. सामाजिक जाणीवेपोटी काही कामे हातात घ्यावी लागतील. उघडपणे बोलू नका. - तुळ:-
हाती आलेल्या संधीचे सोने करावे. ओळखीने कामे होतील. भडक मत मांडू नका. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. - वृश्चिक:-
कलेला चांगला वाव मिळेल. मानसिक सौख्य लाभेल. वडीलधाऱ्यांचे मत घ्यावे. कामाचे स्वरुप लक्षात घेऊन नियोजन करावे. सन्मानास पात्र व्हाल. - धनु:-
जोडीदाराविषयी होणारे गैरसमज दूर करावेत. अति घाई उपयोगाची नाही. जबाबदारीची जाणीव ठेवाल. वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करावे. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. - मकर:-
जुन्या गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीला नावे ठेवू नयेत. तुमच्यातील उदारपणा दाखवावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. चटकन मत बनवू नका. - कुंभ:-
उताविळपणा करु नका. चर्चेवर अधिक भर द्यावा. सामोपचाराने गोष्टींकडे पहावे. एकमेकांतील प्रेमभावनेची जपणूक करावी. हट्टीपणा दूर सारावा. - मीन:-
कामातील बदल अनुकूल ठरेल. नोकरांची उत्तम साथ लाभेल. चुगलीखोर लोकांकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांचे प्रश्न समोर येतील. हातातील कामास यश येईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३० ऑगस्ट २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 30-08-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 30 august 2019 aau