- मेष:-
कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. औद्योगिक वातावरण चांगले राहील. व्यवसाईक ठिकाणी मने जिंकून घ्याल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. - वृषभ:-
तुमची सहृदयता दिसून येईल. चांगले साहित्य वाचाल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. कलेला उत्कृष्ट वातावरण लाभेल. - मिथुन:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यांतून धनलाभ संभवतो. सासुरवाडीची मदत मिळेल. मुलांशी मतभेद संभवतात. - कर्क:-
दिवस आनंदात जाईल. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप होईल. घरगुती कामे वाढतील. ज्येष्ठांची काळजी घ्यावी. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. - सिंह:-
तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. कामात विशेष प्राविण्य मिळवाल. कामाची योग्य पावती मिळेल. वाहन जपून चालवावे. मानसिक तोल सांभाळावा. - कन्या:-
मनात येईल तसा खर्च कराल. वादविवादात पडू नये. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. लहरीपणाने वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. - तूळ:-
दिवसभर कामाची गडबड असेल. कर्तुत्वाला वेग येईल. स्वबळावर काम करण्याकडे कल राहील. थोडा हट्टीपणा कमी करावा. सर्व गोष्टींचा समतोल राखणे शक्य होईल. - वृश्चिक:-
सामुदायिक वादात लक्ष घालू नका. क्षुल्लक अडचणींवर मात करावी. दिवसभर धावपळ करावी लागेल. काही कामे विनासायास अडकून पडतील. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करावे. - धनु:-
प्रॉपर्टीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. झोपेची तक्रार जाणवेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. मौल्यवान वस्तू संभाळाव्यात. शांतपणे विचार करावा. - मकर:-
काही बदल अचानक दिसून येतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. यात्रेचे योग येतील. गप्पीष्ट लोकांच्या समुहात वावराल. लहानात लहान होऊन खेळाल. - कुंभ:-
वरिष्ठांना नाराज करु नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कामाचे सखोल ज्ञान घ्यावे. उपासनेकडे अधिक लक्ष द्यावे. वाहन चालवतांना सतर्क राहावे. - मीन:-
कामात घरातील स्त्रियांचा हातभार लागेल. मनातील इच्छेला मूर्त रुप द्यावे. नवीन मित्र जोडाल. उष्णतेचे विकार जाणवतील. पत्नीचा हट्ट पुरवाल.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 16-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 16 december 2019 aau