मेष

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. ओम ऱ्हीं क्लीं शिवाय नमः या बीज मंत्राचे उच्चारण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. घरातील देवाला दही भाताचा नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – निळा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. सदगुरुचे स्मरण करावे. गुरू मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

सिंह

­­आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. संमिश्र लाभाचा दिवस आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
आजचा रंग – नारंगी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेवाचे दर्शन घेऊन दक्षिणा अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी, वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती आणि महादेव मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

धनु

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. ओम शांभवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

मकर

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. महत्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. गणपती मंदिरामध्ये फुले अर्पण करावी
आजचा रंग – पांढरा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची उपासना करावी.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. कालभैरव आणि महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 17 april