मेष

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करणे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवणे.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय शकाल. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. महादेवाच्या मंदिरामध्ये धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावीत.
आजचा रंग – नारंगी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण असेल. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – पोपटी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागावे. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग – निळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. महादेवाच्या मंदिरात अभिषेक करणे.
आजचा रंग – पांढरा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. धाडसी निर्णयाचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. ओम सोमाय नमः जप करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – तपकिरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवतेचे स्मरण करुन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – निळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरू ठेवण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. संध्याकाळी महादेवाचे दर्शन घेणे. पशुपक्षांना अन्नदान करणे.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 24 april