मेष

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वांच्या कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. घरातून निघताना ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – आकाशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. आर्थिक निर्णय, नियोजन करावे, कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात.
आजचा रंग – निळा

मिथुन

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस नाही. मुलांच्या भविष्यासाठी निर्णय घ्याल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कामाचा ताण कमी होईल. भैरव दर्शन घेणे.
आजचा रंग – करडा

कर्क

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावीत. कामांत ताण जाणवेल. वाद वाढवू नयेत. उलाढाली जपून कराव्यात. जुने स्नेही भेटतील. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

सिंह

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. आर्थिक निर्णय, नियोजन करावे. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. ओम श्री लक्ष्मीयै नमः या जप करणे.
आजचा रंग – हिरवा

तुळ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. व्यवसायात वाढ होईल. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत. महामृत्यूंजय जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी, आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – गुलाबी

धनु

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नवीन कामांसाठी, जुन्या कामाच्या पाठपुराव्यासाठी, गाठीभेटीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

मकर

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कुठलेही मोठे धाडस करू नये. साधारण दिवस आहे. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. विष्णू दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

कुंभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक बाजू भक्कम करणारा दिवस. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुनी येणी वसूल होतील. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. नवीन कामांसाठी, जुन्या कामांच्या पाठपुराव्यासाठी गाठीभेटीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 30 janaury