मेष

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. भावंडाच्या गाठीभेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – लाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

संध्याकाळनंतर मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी दिवस चांगला आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. गुरुजनांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन महत्त्वाची कामे सुरू करावी.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मिश्र प्रतिसादाचा दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, गाठीभेटीसाठी योग्य दिवस. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेवाच्या मंदिरात तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यवहार जपून करणे. प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

सिंह

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या लाभाचा दिवस आहे. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग – सोनेरी

कन्या

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी, व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. भविष्यातील आर्थिक योजनांचे नियोजन कराल. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

तुळ

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामांचा ताण जाणवेल. आर्थिक आवक चांगली असेल. परदेशाशी निगडित व्यापार व्यावसायिकांना उत्तम योग आहेत. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – सोनेरी

वृश्चिक

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. ओम श्री लक्ष्मीयै नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

मकर

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – लाल

कुंभ

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संततीसौख्य लाभेल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

मीन

मिथुन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. घरातून निघताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 6 february