- मेष:-
हरहुन्नरीपणा दाखवून द्यावा. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. - वृषभ:-
बोलण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. प्रवास मजेत घडेल. वाचनाची आवड भागवाल. वडीलांचा विरोध होऊ शकतो. आपल्या तरल बुद्धीचा वापर करावा. - मिथुन:-
जोडीदाराचे कौतुक करावे. विचारांना योग्य चालना द्यावी. भावंडांना मदत कराल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांचे प्रश्न सावधगिरीने हाताळा. - कर्क:-
जोडीदाराची प्रगती अनुभवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जवळचा प्रवास घडेल. सहकुटुंब फिरण्याचा आनंद मिळेल. मनातील गैरसमज बाजूला सारावेत. - सिंह:-
इतरांचा विश्वास संपादन करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कफाचे त्रास संभवतात. उगाचच भांडणात अडकू नका. - कन्या:-
लेखकांच्या कामाला वेग येईल. तुमच्यातील धाडस वाढेल. कौटुंबिक समाधान लाभेल. खर्च देखील काहीसा वाढेल. बोलता-बोलता शब्द देवू नका. - तूळ:-
रागावर नियंत्रण ठेवावे. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. आपले मत परखडपणे मांडाल. नवीन मित्र जोडाल. - वृश्चिक:-
तुमच्यातील उतावीळपणा वाढेल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. ज्ञान गोळा कराल. आपल्याकडची माहिती इतरांना द्याल. बोलतांना तोल जाऊ देवू नका. - धनू:-
गोड शब्दांनी सर्वांना जिंकाल. एखादे वाद्य शिकण्याची इच्छा होईल. कमिशनमधून चांगला लाभ होईल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. - मकर:-
आपल्या बुद्धीचा सदुपयोग करावा. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी व्यक्तींना लाभ होईल. आपले मत चांगल्याप्रकारे मांडाल. बुद्धी चातुर्य दाखवावे. - कुंभ:-
महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मानसिक चंचलता जाणवेल. बढतीचे योग येतील. कामाच्या स्वरुपात बदल होईल. थोडे अधिक कष्ट पडण्याची शक्यता आहे. - मीन:-
मनातील इच्छा पूर्णत्त्वाला जातील. मित्रांची उत्तम साथ राहील. आभ्यासू लोकांच्यात वावराल. व्यापारीवर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या ओळखी वाढतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, रविवार, २६ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 26-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi sunday 26 january 2020 aau