मेष

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कामात ताणतणाव जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. कामगारांना जपावे. वाद वाढवू नये. ओम हीं क्लीम श्री या बीज मंत्राचा ११ वेळा जप करून दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरुंचे आणि गणपतीचे स्मरण करावे. कार्यात ज्येष्ठांचा आशिर्वाद घ्यावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व महत्त्वांच्या कामांसाठी उत्तम दिवस, गाठीभेटीसाठी घ्याव्यात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि देवी कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. अधिकारी वर्गाची, वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल. आज एकट्याने निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

सिंह

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस, मोठे निर्णय घेऊ नये. प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ताणतणाव कमी होईल. कुलदैवतेचे पूजन आणि स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

कन्या

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये लाल फूल अर्पण करावे.
आजचा रंग – नारंगी

तुळ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक स्थिती सुधारेल, जुनी येणी वसूल होतील, पाठपुरावा करावा. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांना उत्तम दिवस. संधी उपलब्ध होतील. व्यवसाय वाढीचे योग आहेत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

धनु

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे. भावंडाच्या भेटीगाठीचे योग आहेत. आनंदात दिवस घालवाल. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – आकाशी

मकर

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस महत्त्वाच्या कामांची योजना आखावी. गाठीभेटीसाठी घ्याव्यात. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सावधपणे कामे करावीत. कुणालाही गृहित धरू नये. व्यवसाय नोकरीत उत्साहाचे वातावरण राहिल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. मारुतीचे दर्शन घ्यावे आणि अन्नदान करावे.
आजचा रंग – पांढरा

मीन

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस, महत्त्वाच्या कामाची योजना आखावी. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरात पांढरी फुले अर्पण करावीत.
आजचा रंग – पोपटी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 17 january