- मेष:-
किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. हातातील कलेला वेळ द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. - वृषभ:-
उधारीचे व्यवहार नकोत. मुलांच्या सहवासातून आनंद मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. अधिकार्यांच्या रोषाला बळी पडू नका. नवीन योजनांवर काम कराल. - मिथुन:-
करमणुकीत वेळ घालवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कष्टाला पर्याय नाही. समोरील गोष्टीचा आनंद घ्याल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल. - कर्क:-
महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. ध्यानधारणा करावी. दिवसभर आत्ममग्न राहाल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. सामाजिक हितसंबंध सुधारतील. - सिंह:-
शब्द देताना शहानिशा करा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंता करत बसू नका. जबाबदार्या वाढतील. आपल्या भावना उत्कृष्ट पद्धतीने मांडाल. - कन्या:-
पती पत्नीमध्ये गैरसमजाचे वारे वाहू शकतात. वेळेचे महत्त्व ध्यानात घ्या. परिस्थितीनुरूप बदलावे लागेल. कौटुंबिक वातावरण खेळते राहील. दिवसाच्या पूर्वार्धात चांगली कामे करावीत. - तूळ:-
अडचणीवर खंबीरपणे मात कराल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराची बाजू वरचढ ठरू शकते. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील. - वृश्चिक:-
मानसिक चंचलता जाणवेल. नसती काळजी करू नका. पराक्रमाला वाव आहे. हातातील कामात यश येईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. - धनू:-
प्रसंग ओळखून सामाजिक कार्य करा. मुलांचे वागणे स्वतंत्र वृत्तीचे वाटेल. अंगमेहनतीची कामे कराल. दैनंदिन कामात चाल ढकल करू नका. जोडीदार तुमची इच्छा पूर्ण करेल. - मकर:-
उगाच रागराग करू नका. वाणीवर ताबा ठेवणे हिताचे ठरेल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढाल. कामाचा उरक वाढेल. - कुंभ:-
खेळीमेळीतून सत्कार्य कराल. कामाचा जोम वाढेल. समोरील संधि ओळखायला शिका. जोडीदाराच्या प्राप्तीत वाढ होईल. व्यवहारकुशलता दाखवावी. - मीन:-
अचानक धनलाभाचा योग. कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. प्रकृतीत सुधारणा होईल. पथ्यपाणी चुकवू नये.आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर कराAlready have a account? Sign in– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
First published on: 25-08-2020 at 00:33 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 25th august 2020 aau