मेष

संमिश्र प्रतिसादाचा दिवस. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. गणपती अष्टक म्हणावे.
आजचा रंग – राखाडी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ

साधारण लाभाचा दिवस त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. वरिष्ठांशी सलोखा राखील. कुलस्वामिनीची ओटी भरावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

लाभदायक ग्रहस्थिती. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस आहे. शिवमानस पुजेचे वाचन करावे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

दुपारनंतरचा कालखंड सर्व व्यवहारांसाठी चांगला राहील. नियोजनपूर्व दिवसांची आखणी करावी. आजचे ग्रहमान सर्वकामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग – हिरवा

सिंह

साधारण लाभाचा दिवस त्यामुळे वादविवाद टाळावेत. नियोजन पूर्व दिवसांची आखणी करावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. गणपती मंदिरामध्ये तांबडे फुले अर्पण करावे.
आजचा रंग – पोपटी

कन्या

सर्व प्रकारची लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कमांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंड आणि तांबे या धातूंशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गडद गुलाबी

वृश्चिक

दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. सकाळी गणपती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – गडद निळा

धनु

मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायांत मोठे धाडस नको. घरांमध्ये तुपाचा दिवा लावून ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

मकर

कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायांशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. कुलदैवतांचे स्मरण करावे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

कौटुंबिक सौख्य जाणवेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासांमध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विंवचना राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

मीन

मुलांशी निगडित किंवा घरातील धाकट्या भावंडाशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणीमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. श्री बुधाय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – आकाशी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 8 march