मेष:-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिस्थितीला नावे ठेऊ नका. आपल्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधा. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा. मित्रांशी मतभेद संभवतात.

वृषभ:-

व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल. तुमचा तर्क अचूक लागेल. आपले मत गोडीने समजावून सांगाल. कामाचा व्याप वाढेल. अती श्रमाचा ताण राहील.

मिथुन:-

हसतहसत कामे साधून घ्याल. तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा. आपले विचार मोजक्या शब्दात मांडा. झोपेची तक्रार जाणवेल.

कर्क:-

जोडीदाराची उत्तम साथ राहील. मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. फसवणुकीपासून सावध राहावे.  जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

सिंह:-

कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. कामात हाताखालील सहकार्‍यांची मदत होईल. लहान मुलांत रमून जाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

कन्या:-

इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. फक्त कामावरच लक्ष केंद्रीत करावे. मनाची चंचलता जाणवेल. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा.

तूळ:-

वादाच्या दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये.

वृश्चिक:-

जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. घरात प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. कामात प्रगतीला वाव आहे. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

धनू:-

कामे यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. टीकेला सामोरे जावे लागू शकते. हट्ट सोडावा लागू शकतो. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

मकर:-

कामातील चिकाटी वाढवावी. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. चुकून बोललेला शब्द लागू शकतो. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. इतरांना आनंदाने मदत कराल.

कुंभ:-

आपले उद्दीष्ट सध्या करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.

मीन:-

सामाजिक वादात अडकू नका. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल. इतरांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope today 23 may 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr