मेष:-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यावहारिक कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील. कागदपत्रे नीट तपासून घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे.

वृषभ:-

जोडीदाराकडून लाभ होतील. आवडीच्या गोष्टींना वेळ मिळेल. मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक कामात हातभार लावाल.

मिथुन:-

दुसर्‍यावर अवलंबून राहू नका. कामात त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामे सावधानतेने करावीत. गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

कर्क:-

खेळीमेळीत दिवस जाईल. घरात सर्व गोष्टीत टापटीपपणा ठेवाल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकार्‍यांना कामात मदत कराल.

सिंह:-

जवळच्या प्रवासाचा योग येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद मिळेल. जोडीदाराचा स्वभाव आग्रही राहील.

कन्या:-

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. कामात घाई गोंधळ उडू शकतो. योग्य नियोजनावर भर द्यावा. काही गोष्टी अचानक घडू शकतात. चटपटीत पदार्थ खाल.

तूळ:-

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. अचानक धनलाभाच्या घटना घडतील. तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. कामात अधिक कष्ट पडतील.

वृश्चिक:-

मनाच्या चंचलतेला आवर घालावी. जोडीदाराच्या शब्दाला प्रमाण मानावे लागेल. भावंडांना मदत करावी लागेल. भागिदारीतून लाभ होईल. पतीच्या कमाईत वाढ होईल.

धनू:-

मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा. इतरांवर अधिक विसंबून राहू नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा.

मकर:-

कामाला चांगली गती येईल. गोड शब्दातून संवाद साधावा. कामातून चांगले समाधान मिळेल. हातातील कामात यश येईल. दिवस चांगल्या कमाईचा असेल.

कुंभ:-

आर्थिक व्यवहार सतर्कतेने करावेत. घरात तुमचा रूबाब राहील. इतरांना परोपकाराचे महत्त्व  पट‍वून द्याल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे लागेल. बौद्धिक छंद जोपासता येतील.

मीन:-

जास्त अधीर होऊ नका. लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जाऊ नका. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope today 24 may 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr